शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:54 IST

कालीगंज मतदारसंघातील पोटनिवडणूक येथील टीएमसीचे आमदार नसीरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे झाली

कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नादिया जिल्ह्यातील कालीगंज मतदारसंघातील पोटनिवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या पोटनिवडणुकीत सत्ताधारी टीएमसीने या मतदारसंघावर आपला कब्जा कायम ठेवला आहे. पक्षाच्या उमेदवार अलीफा अहमद यांनी भाजपा उमेदवार आशिष घोष यांना तब्बल ५० हजार मतांनी पराभूत केले आहे. या निवडणुकीत अलीफा अहमद यांना १ लाख २ हजार ७५९ मते मिळाली तर घोष यांना ५२ हजार ७१० मते आणि काँग्रेसच्या काबिल उद्दीन शेख यांना २८ हजार ३४८ मते मिळाली आहेत.

कालीगंज मतदारसंघातील पोटनिवडणूक येथील टीएमसीचे आमदार नसीरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे झाली. या पोटनिवडणुकीत टीएमसीने त्यांची मुलगी अलीफा यांना उमेदवारी दिली. अलीफा यांनी वडिलांपेक्षाही अधिक मताधिक्य घेत निवडणुकीत भाजपाचा पराभव केला. निवडणुकीतील विजयानंतर अलीफा म्हणाल्या की, मला सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचे आहे. मी नेहमी कॉमन मॅनसाठी काम करत आली आहे असं त्यांनी सांगितले. या निवडणुकीतील पराभवावर बोलताना भाजपा नेते अमित मालवीय यांनी यंदा कालीगंज मतदारसंघात अधिक हिंदू मते मिळाली असं म्हटले तर काँग्रेस उमेदवाराने टीएमसी आणि भाजपावर धर्माचा वापर करत मतांचे ध्रुवीकरण केल्याचे म्हटले. कालीगंज मतदारसंघात कुठल्याही एका पक्षाचे वर्चस्व नाही. २०११ साली टीएमसी या मतदारसंघात पहिल्यांदा विजयी झाली तेव्हा अलीफा यांचे वडील निवडून आले होते. त्यानंतर पुढल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेस विजयी झाली. परंतु २०२१ साली पुन्हा एकदा नसीरुद्दीन अहमद यांनी बाजी मारली. 

अलीफा अहमद कोण आहे?

राजकारणात वडिलांचा वारसा सांभाळण्यासाठी आलेल्या अलीफा अहमद या पहिल्याच राजकीय परीक्षेत यशस्वी झाल्या. निवडणुकीवेळी अलीफा अहमद यांनी जनतेत जाऊन काम केले. अलीफा यांनी २००९ साली दुर्गापूर इंजिनिअरींग कॉलेजमधून पदवीचे शिक्षण घेतले. ३८ वर्षीय अलीफा यांचे लग्न काजी करीरुल इस्लाम यांच्याशी झाले आहे. त्यांचे पती डॉक्टर आहेत. ते मेडिकल प्रॅक्टिस करतात. त्यात बी.टेक करणारी अलीफा या टीसीएसमध्ये काम करत होत्या. अलीफा यांच्यासाठी राजकारण नवीन नाही. याआधी वडिलांसोबत अनेक राजकीय कार्यक्रमात अलीफा यांनी हजेरी लावली होती. 

दुसऱ्यांदा फडकवला विजयाचा झेंडा

अलीफा या पहिल्यांदा आमदार बनल्या आहेत परंतु याआधी २०१८ साली नादिया जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी निवडणूक लढली आणि जिंकलीही होती. वडील नसीरुद्दीन अहमद यांनी मुलगी अलीफाला राजकारणात आधीच आणले होते. अलीफा अहमद कोलकाता येथे जास्त काळ राहत होत्या परंतु आता आमदार बनल्यानंतर त्यांना नादिया जिल्ह्यात अधिक वेळ द्यावा लागेल. नसीरुद्दीन अहमद कालीगंजमध्ये लालदा नावाने प्रसिद्ध होते. वडिलांच्या जागी निवडून आलेल्या अलीफा यांना मतदारसंघावर त्यांच्या कामाची छाप पाडावी लागेल. हा मतदारसंघ टीएमसीच्या फायरब्रँड नेत्या महुआ मोइत्रा यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो. 

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालElectionनिवडणूक 2024tmcठाणे महापालिका