कुलगाममध्ये चकमक, चार दहशतवाद्यांना कंठस्नान, तीन जवानांना वीरमरण
By Admin | Updated: February 12, 2017 11:17 IST2017-02-12T10:09:57+5:302017-02-12T11:17:08+5:30
कुलगाम येथे आज सकाळपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये सुरू असलेल्या चकमकीत चार

कुलगाममध्ये चकमक, चार दहशतवाद्यांना कंठस्नान, तीन जवानांना वीरमरण
ऑनलाइन लोकमत
कुलगाम (जम्मू आणि काश्मीर), दि. 12 - कुलगाममधील यारीपोरा येथे आज सकाळपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. ही चकमक अद्याप सुरू असून, दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्कराकडून शोधमोहीम सुरू आहे.
यारीपोरा येथील घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यामुळे कोंडीत सापलडलेल्या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार करण्यास सूरूवात केली. दरम्यान, या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत चार दहशतवाद्यांना ठार केले आहे. मात्र चार दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतरही ही चकमक सुरू आहे. त्यामुळे चकमक संपल्यानंतर नेमकी स्थिती स्पष्ट होणार आहे.
#UPDATE: 4 terrorists killed, 4 weapons recovered; 3 security personnel killed & 2 injured. Operation in Kulgam's Yaripora (J&K) still on.
— ANI (@ANI_news) February 12, 2017