कळमेश्वर....
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:11+5:302015-02-14T23:52:11+5:30
लिंगा येथे आयोजन : भाऊराव मोहोड स्मृती कबड्डी स्पर्धा

कळमेश्वर....
ल ंगा येथे आयोजन : भाऊराव मोहोड स्मृती कबड्डी स्पर्धाकाटोलचा संघ विजेताकळमेश्वर : नजीकच्या लिंगा येथील जय बजरंग क्रीडा मंडळाच्यावतीने भाऊराव मोहोड व ऐश्वर्या पाल स्मृती कबड्डी स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यात काटोलच्या संघाने विजेतेपद पटकावले तर गुमथळा संघ उपविजेता ठरला.उद्घाटन आ. सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी किशोर मोहोड होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मनोहर कुंभारे, पं.स. वैभव घोंगे, सरपंच सुभाष किरपाल, ॲड. राहुल मोहोड, प्रशांत निंबाळकर, अशोक भागवत, मोहन झोडापे, शंकर झाडे, वामन भुजाडे, नामदेव खेडकर, नंदू भुजाडे, माणिक कंगाली, मनोज पाल, बल्लू साभारे, मनोहर पाल, रत्नपारखी, गिरी, ढवळे आदींची उपस्थिती होती.खेळांमध्ये विजय, पराजय होतोच, परंतु जोपर्यंत आपण स्पर्धेत जिंकण्याची जिद्द बागळत नाही, तोपर्यंत ध्येय गाठता येत नाही. जिद्दीने कोणत्याही स्पर्धेत यश गाठता येते, असे प्रतिपादन आ. सुनील केदार यांनी केले. कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक संघांनी सहभाग घेत अतिशय चुरशीची लढत दिली. यात काटोल येथील संघ विजेता ठरला तर गुमथळा येथील संघाने उपविजेतेपद पटकावले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रोशन साभारे, दयाराम साभारे, सचिन गिरी, अमोल पुरी, शेखर फलके, भूषण साभारे, शैलेश भुजाडे, प्रफुल चौधरी, शंकर चुटे, सुनील साव, प्रणय चौधरी, अखिल पाल, आकाश किरपाल, श्रावण पाल, नितीन चौधरी, आकाश मोजे आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)