शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

'काका, माझ्या बहिणीला सोडा'; पाच वर्षांचा भाऊ नराधमाला गयावया करत राहिला, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 18:27 IST

पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका खासगी लग्झरी बसच्या क्लीनरने त्या चिमुकलीचं लैंगिक शोषण केलंय.

कोलकाता- पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यात तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका खासगी लग्झरी बसच्या क्लीनरने त्या चिमुकलीचं लैंगिक शोषण केलंय. चिमुकलीवर तो नराधम क्लीनर बसमध्ये नेऊन बलात्कार करत असताना तिच्या पाच वर्षांच्या भावानं गयावया करत बहिणीला सोडण्याची विनंती केली. परंतु तो नराधम थांबला नाही आणि त्यानं तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी त्या क्लीनरला अटक केली.कोलकातातल्या कनाल वेस्ट रोडवर एका लग्झरी बसमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितलं की, 45 वर्षीय आरोपी बस क्लीनर शेख मुन्नाला अटक केली आहे. तर पीडित मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अत्याचारामुळे लहानगीच्या शरीरातून जास्त रक्तस्राव झाला आहे. त्यामुळे तिची प्रकृती नाजूक आहे. रुग्णालयानं मुलीचे मेडिकल रिपोर्ट दिल्यानंतरच पुढची कारवाई करण्यात येणार आहे, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. झालं असं की, घराबाहेर तीन वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा असे बहीणभाऊ खेळत होते. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका बसमध्ये क्लीनर बसला होता. तीन वर्षांची ती चिमुकली उभ्या असलेल्या बसजवळ चेंडू आणण्यासाठी गेली होती. त्या संधीचा फायदा घेत क्लीनरनं तिला चॉकलेटचं आमिष दाखवून बसमध्ये बोलावलं. चिमुकली बसमध्ये येताच त्या क्लीनरनं दरवाजा बंद केला आणि मुलीवर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. बाहेर उभा असलेला भाऊ बहिणीला बसमध्ये असहाय्य अवस्थेत पाहून गयावया करू लागला.बहीण मोठमोठ्यानं ओरडत असल्याचं पाहून पाच वर्षांच्या भावानं दरवाजा जोरजोरात ठोठावला. आरोपीनं दरवाजा न उघडल्यामुळे अखेर तो आईला बोलावून घेऊन आला. त्यानंतर आईनं आरडाओरड करत लोकांना जमवलं. जमलेल्या लोकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आहे. चिमुकलीची परिस्थिती पाहून डॉक्टरही संभ्रमात पडले. आरोपींना लोकांनी चोप दिला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.चिमुकलीला घेऊन कुटुंबीय आर. जी. कर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले आहे. मुलीला रुग्णालयात आणण्यात आलं त्यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. परंतु रात्रभर उपचार केल्यानंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्या मुलीला वाचवता येऊ शकतं, अशी आशा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Molestationविनयभंग