कुजबूज (प्रसाद म्हांबरे) सीएम ते पीएम

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:28+5:302015-08-16T23:44:28+5:30

कांदोळी पंचायतीच्या ग्रामसभेला एका हॉटेलातील मलनिस्सारण प्रकल्पासंबंधी चर्चा सुरू होती. संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने मलनिस्सारणसंबंधी योग्य पावले न उचलल्याने त्यांना जाब विचारण्यात यावा, अशी सूचना काही नागरिकांनी केली. त्यावर सरपंचांनी पंचायतीने हॉटेलच्या जीएमला चर्चेसाठी बोलावल्याची माहिती सभेला दिली. यावर एका वयस्कर नागरिकाने मध्येच उठून जीएमच्या जागी सीएम असे ऐकल्याने सीएमविरोधात बोलायला सुरुवात केली. आमचे सीएम काहीच करीत नाहीत, असे जोरजोराने म्हणत असताना सरपंचांनी त्यांना सीएम नाही, तर जीएम म्हटल्याचे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. सरपंचांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या पलीकडे असलेल्या या नागरिकाने आपला राग जीएम, सीएम व पीएम या सगळ्यांवर एकत्रित काढला. सगळे एकाच प्रकारे वागतात त्यांच्यामुळे लोकांना त्रास होत असल्याचे

Kajubuz (Prasad Mhambrey) CM to PM | कुजबूज (प्रसाद म्हांबरे) सीएम ते पीएम

कुजबूज (प्रसाद म्हांबरे) सीएम ते पीएम

ंदोळी पंचायतीच्या ग्रामसभेला एका हॉटेलातील मलनिस्सारण प्रकल्पासंबंधी चर्चा सुरू होती. संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने मलनिस्सारणसंबंधी योग्य पावले न उचलल्याने त्यांना जाब विचारण्यात यावा, अशी सूचना काही नागरिकांनी केली. त्यावर सरपंचांनी पंचायतीने हॉटेलच्या जीएमला चर्चेसाठी बोलावल्याची माहिती सभेला दिली. यावर एका वयस्कर नागरिकाने मध्येच उठून जीएमच्या जागी सीएम असे ऐकल्याने सीएमविरोधात बोलायला सुरुवात केली. आमचे सीएम काहीच करीत नाहीत, असे जोरजोराने म्हणत असताना सरपंचांनी त्यांना सीएम नाही, तर जीएम म्हटल्याचे सांगून समजावण्याचा प्रयत्न केला. सरपंचांचे म्हणणे ऐकून घेण्याच्या पलीकडे असलेल्या या नागरिकाने आपला राग जीएम, सीएम व पीएम या सगळ्यांवर एकत्रित काढला. सगळे एकाच प्रकारे वागतात त्यांच्यामुळे लोकांना त्रास होत असल्याचे ते शेवटी म्हणाले व खाली बसले.
---------------

Web Title: Kajubuz (Prasad Mhambrey) CM to PM