कुजबूज (प्रसाद म्हांबरे) फोटो
By Admin | Updated: October 3, 2015 00:20 IST2015-10-03T00:20:29+5:302015-10-03T00:20:29+5:30
पोझ

कुजबूज (प्रसाद म्हांबरे) फोटो
प झ गांधी जयंतीनिमित्त शाळांत व सरकारी कार्यालयांत साफसफाई करण्याचा कार्यक्रम झाला. शाळेत अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा, अशा प्रकारचे परिपत्रक शिक्षण खात्याने काढले होते. आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे फोटो पाठवून देण्यात यावे, अशीही सूचना त्यात करण्यात आली होती; पण या सूचनेमुळे परिसर स्वच्छ करण्यापेक्षा फोटोसाठी पोझ देण्यासाठी अधिक वेळ गेला. काही सरकारी कार्यालयांत तसेच काही शैक्षणिक संस्थांत बर्याच जणांनी खास फोटोसाठी पोझही दिल्या. पर्वरी व इतर काही भागात तर काहीजण रस्त्याच्या बाजूला पडलेला कचरा उचलतानाची नुसती पोझ देऊन माघारी फिरले. त्यामुळे हा कार्यक्रम फक्त फोटोसाठीच असल्यासारखे वाटत होते.