शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमचे सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू, भाजपा नेत्याचे वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 09:52 IST

पुरुलियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

कोलकाता : भाजपाचे महासचिव आणि पश्चिम बंगालमधील पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलाश विजयवर्गीय यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमधील अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. शुक्रवारी येथील पुरुलियामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमात जनसमुदायाला संबोधित करताना कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, "आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू." याचबरोबर, कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, "ज्यांना कोंबडा बनवायचा आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार केली आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोडता येत नाहीत." 

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये ज्यावेळी भाजपाचे सरकार बनेल, "त्यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होईल. जे अधिकारी चमचेगिरी करत आहेत, भ्रष्टाचार करता आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. त्यांची यादी तयार होत आहे. त्यांची यादी तयार झाल्यानंतर शोलेमधील तोच डायलॉग असले की अब तेरा क्या होगा कालिया."

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कैलाश विजयवर्गीय याआधीही चर्चेत राहिले आहेत. गेल्या काही दिवासांपूर्वी  कैलाश विजयवर्गीय यांनी एका अधिकाऱ्याला धमकी देताना मध्य प्रदेशातील इंदूरला आग लावण्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कैलाश विजयवर्गीय हे इंदूरचे विभागीय आयुक्त आकाश त्रिपाठी यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यामुळे कैलाश विजयवर्गीय यांचा तोल सुटला आणि अधिकाऱ्याला थेट धमकी देताना म्हणाले होते,' अधिकारी आहात म्हणून नाहीतर इंदूरला आग लावली असती'.

दरम्यान, कैलाश विजयवर्गीय हे भाजपाचे मोठे नेते आहेत. त्यांचे पुत्र आकाश विजयवर्गीय हे सुद्धा आमदार आहेत. आकाश विजयवर्गीय यांनी जुन्या जीर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या इंदूर पालिकेच्या अधिकाऱ्याला चक्क बॅटने मारहाण केली होती. त्यावेळी ते चर्चेत आले होते. या प्रकरणी आकाश विजयवर्गीय यांना अटक झाली होती आणि जामीन मिळण्यापूर्वी काही दिवस तुरुंगाची हवाही खावी लागली होती. 

(Video : '...तर इंदूरला आग लावली असती', भाजपा नेत्याचा तोल सुटला)

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल