शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कैलास मानसरोवरची यात्रा होणार नथु ला आणि लिपूलेख ला या दोन्ही मार्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 15:55 IST

डोकलाम पठारावर भारत आणि चीन एकमेकांसमोर ठाकल्यानंतर नथु ला मार्गे भारतीय यात्रेकरुंना कैलास मानससरोवराला जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चीनने या मार्गाला परवानगी दिल्यानंतर तिबेटमधील पवित्रस्थळांना भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देकैलास पर्वत आणि मानससरोवर हे चीनने गिळंकृत केलेल्या तिबेट प्रांतात येते. तिबेटला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात आलेला आहे. 8 जून ते 8 सप्टेंबर या काळामध्ये यात्रेकरुंच्या तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील.

नवी दिल्ली-डोकलाम पठारावर भारत आणि चीन एकमेकांसमोर ठाकल्यानंतर नथु ला मार्गे भारतीय यात्रेकरुंना कैलास मानससरोवराला जाता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र चीनने या मार्गाला परवानगी दिल्यानंतर तिबेटमधील पवित्रस्थळांना भेट देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यासाठी यात्रेकरुंच्या नोंदणीला सुरुवातही केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयातर्फे या यात्रेचे आयोजन आणि नियमन करण्यात येते. कैलास पर्वत आणि मानससरोवर हे चीनने गिळंकृत केलेल्या तिबेट प्रांतात येते. तिबेटला स्वायत्त प्रांताचा दर्जा देण्यात आलेला आहे. 8 जून ते 8 सप्टेंबर या काळामध्ये यात्रेकरुंच्या तुकड्या ही यात्रा पूर्ण करतील. सिक्किममधील नथु ला आणि उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून ही यात्रा करता येईल. डोकलाम येथे निर्माण झालेल्या पेचप्रसंगानंतर चीनने नथु लाचा मार्ग बंध केला होता. 28 ऑगस्ट रोजी या दोन्ही देशांमधील तणाव निवळला. अर्थात नथु ला बंद झाली तरी लिपुलेख खिंडीचा मार्ग भारतीयांना उपलब्ध होताच.लिपुलेख खिंडीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकांना थोडे ट्रेकिंगही करावे लागते. या मार्गाने जाण्यासाठी प्रतीव्यक्ती 1.6 लाख रुपये खर्च येतो. यावर्षी प्रत्येकी 60 यात्रेकरुंच्या 18 तुकड्या यामार्गे कैलास-मानसला जातील. प्रत्येक तुकडीला या प्रवासासाठी 24 दिवसांचा अवधी लागेल त्यामध्ये तयारीसाठी दिल्लीमध्ये व्यतीत कराव्या लागणाऱ्या 3 दिवसांचाही समावेश आहे.मात्र ट्रेकिंग करु न शकणाऱ्या आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी नथु लाचा मार्ग उपलब्ध आहे. सिक्किमची राजधानी गंगटोकपासून जाणारा हा मार्ग हांगू सरोवराजवळून तिबेटला जातो. या मार्गाने जाण्यासाठी 2 लाख रुपये खर्च येतो. या यात्रेसाठी 21 दिवस लागतात, त्यातील 3 दिवस दिल्लीमध्ये तयारीसाठी द्यावे लागतात. यावर्षी 50 सदस्यांच्या 10 तुकड्या या मार्गाने जातील असा अंदाज परराष्ट्र मंत्रालयाने वर्तवला आहे.

टॅग्स :IndiaभारतDoklamडोकलामchinaचीन