खडकी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास आरगडे
By Admin | Updated: March 19, 2015 22:36 IST2015-03-19T22:36:23+5:302015-03-19T22:36:23+5:30
मंचर : खडकी (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास महादू आरगडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

खडकी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास आरगडे
म चर : खडकी (ता. आंबेगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कैलास महादू आरगडे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग किसन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.खडकी सोसायटीने बिनविरोध निवडणूकीची परंपरा याही वेळी कायम राखली. संचालक म्हणून दादाभाऊ पोखरकर, दत्ता हगवणे, मारुती वाबळे, अनंथा भोर, रामदास वायकर, शरद भोर, तान्हाजी राक्षे, गेनभाऊ मोरे, बबाबाई पोखरकर, कुसुम भिडे, कैलास अरगडे, पांडुरंग पाटील हे निवडून आले.अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदी कैलास आरगडे, उपाध्यक्षपदी पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली. समाजसेवक दादाभाऊ पोखरकर, उपसरपंच अशोक भोर, तंटामुक्ती अध्यक्ष अर्जुन बांगर, दत्ता भोर, बाबासाहेब पोखरकर, संभाजी पाटील, दादाभाऊ बांगर, रामदास चिखले, विजय पोखरकर यांच्या हस्ते करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. एस. घायाळ व ------------ ???सचिव अंकुश तुळेकर, रोहिदास वाबळे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)०००फोटो आहेत.