भररस्त्यात गोळ्या घालून कबड्डी खेळाडूची हत्या
By Admin | Updated: March 16, 2016 21:38 IST2016-03-16T21:31:57+5:302016-03-16T21:38:08+5:30
हरियाणा राज्यातील रोहतक येथे मंगळवारी सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या कबड्डी खेळाडूची दोन गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली.

भररस्त्यात गोळ्या घालून कबड्डी खेळाडूची हत्या
>ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. १६ - हरियाणा राज्यातील रोहतक येथे मंगळवारी सायंकाळी रस्त्याने जात असलेल्या कबड्डी खेळाडूची दोन गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली. कायदा सुव्यवस्थेचे चित्र किती भयाण आहे आणि येथे माणसाच्या जीवाचे मोल काय आहे. यावर विचार करणे गरजेचं आहे.
ही घटना पोलीस ठाण्याच्या अंतर्गत रिठाल गावात झाली. शहरातून गावाकडे जाणारा कबड्डी खेळाडू सुखविंदर फोनवर बोलत असताना. त्याच्यावर मारेकऱ्यांनी नरज ठेऊन हत्या केल्याचे उघड झाले आहे. प्रथम मोटारसायकलवरून एका व्यक्ती येऊन सुखविंदर थांबलेल्या ठिकाणाची आणि परिस्थितीची माहिती घेऊन जातो. त्यानंतर स्कूटीवरून दोन तरुण येतात. आणि हल्ला करातात.
स्कूटीवर मागच्या बाजुला बसलेला तरुण कबड्डी खेळाडूच्या छातीत गोळी मारतो. त्यानंतर जमिनीवर कोसळलेल्या सुखविंदरवर दोन गुंड जवळून गोळीबार करण्याचा प्रयत्न करतात पण फायरिंग होत नाही. परंतु सुखविंदरच्या नशीबाने जास्त वेळ साथ दिली नाही. क्षणातच गुंडाच्या पिस्टलमधून गोळ्या बाहेर पडल्या आणि सुखविंदरच्या शरीराची चाळण केली. घटनेनंतर काही वेळातच सुखविंदरचा मृत्यू झाला.