कबड्डी खेळाडूवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: October 28, 2016 21:47 IST2016-10-28T21:24:40+5:302016-10-28T21:47:43+5:30
कबड्डी खेळाडूवर सामूहीक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून यामध्ये काँग्रेस पक्षाच्या

कबड्डी खेळाडूवर सामूहिक बलात्कार
ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. 28 - पंजाबच्या लुधियानामध्ये एका कबड्डी खेळाडूवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली असून यामध्ये काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीतील एका नेत्याचाही समावेश आहे. अवतार सिंग , निर्मल सिंग आणि शेहनाझ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
पीडित तरूणी ही 19 वर्षांची असून ती चंदीगढची आहे. बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. दिवाळीची खरेदी करण्याच्या बहाण्याने खन्ना या गावात राहणा-या अवतार सिंग याने तिला गावात बोलावले, कबड्डी स्पर्धेचं आयोजन करायचे आहे असं खोटं त्याने तिला सांगितलं. पीडित गावात आल्यानंतर अवतार तिला एका घरात घेऊन गेला तेथे अवतारचा भाऊ निर्मल आणि शेहनाझ उपस्थित होते. थोड्यावेळाने तिला बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार करण्यात आला. यावेळी शेहनाझ ही घरातच होती मात्र, ती पीडितेच्या मदतीला आली नाही.
कशीबशी तेथून सुटका करून घेतल्यावर तिने एका मित्राला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर दोघांनी स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. शेहनाज ही काँग्रेसच्या महिला आघाडीत पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.