भाजयुमोतर्फे उमवित निदर्शने जेएनयूतील प्रकार: कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2016 00:03 IST2016-02-23T00:03:22+5:302016-02-23T00:03:22+5:30
जळगाव : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार व त्याच्या साथीदारांनी राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ भाजयुमोतर्फे विद्यापीठ परिसरात निदर्शने करण्यात येऊन या प्रकरणी संबंधीतांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

भाजयुमोतर्फे उमवित निदर्शने जेएनयूतील प्रकार: कारवाईची मागणी
ज गाव : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमार व त्याच्या साथीदारांनी राष्ट्रविरोधी घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ भाजयुमोतर्फे विद्यापीठ परिसरात निदर्शने करण्यात येऊन या प्रकरणी संबंधीतांवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली. भारतीय जनता युवा मोार्चाचे जिल्हाध्यक्ष चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान विरोधात घोषणा देत दिल्लीतील घटनेचा निषेध केला. तसेच राष्ट्रध्वज फडकावत राष्ट्रगीत म्हणण्यात आले. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सागर पाटील, रितेश लिंबडा, सचिन जोशी, सुहास जोशी, योगेश इंगळे, मिलिंद चौधरी, सौरभ चौधरी, मयुर भोळे, बॉबी चांगरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. ----जस्टीस फॉर पीपल्स सोसायटीतर्फे निवेदनजस्टीस फॉर पीपल्स सोसायटीतर्फे दिल्लीतील घटनेचा निषेध करण्यात येऊन आंदोलनकर्त्यांचे समर्थन करणार्या कॉँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. कॉँग्रेसची मान्यता रद्द करावी अशी मागणी माजी सैनिक व संघटनेचे सचिव नगराज जनार्दन पाटील यांनी केली आहे. तसेच नेहरू विद्यापीठाची मान्यता काढून विद्यापीठही बंद करावे असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.