शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

जेव्हा राज्यसभेत 'आमने-सामने' आले दिग्विजय सिंह अन् ज्योतिरादित्य शिंदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 14:59 IST

राज्यसभेत एक गमतीशीर प्रसंगही पाहायला मिळाला. सर्व खासदार शपथ घेत असताना, अचानक ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह आमने-सामने आले. अन्...

ठळक मुद्देनुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत 20 राज्यांतून 61 सदस्य नवडून आले आहेत. शरद पवार, दिग्विजय सिंह आणि रामदास अठवले यांच्यासह 12 सिटिंग खासदारांचाही घेतली शपथ.शिंदे आणि दिग्विजय सिंह ये दोघेही एकाच राज्यातील म्हणजे मध्यप्रदेशातील आहेत.

नवी दिल्ली - राज्यसभेत आज 45 नव्याने निवडून आलेल्या सदस्यांनी शपथ घेतली. यांपैकी 36 खासदार तर प्रथमच राज्यसभेत पोहोचले आहेत. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत 20 राज्यांतून 61 सदस्य नवडून आले आहेत. यांपैकी 45 जणांनी शपथ घेतली. यात शरद पवार, दिग्विजय सिंह आणि रामदास अठवले यांच्यासह 12 सिटिंग खासदारांचाही समावेश होता. काँग्रेसचा हात सोडून भाजपाचे कमळ हातात घेतलेल्या ज्योतिरादित्य शंदे यांनीही राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.

यावेळी राज्यसभेत एक गमतीशीर प्रसंगही पाहायला मिळाला. सर्व खासदार शपथ घेत असताना, अचानक ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह आमने-सामने आले. या दोघांनीही मास्क लावलेले होते. जेव्हा शिंदे आणि दिग्विजय सिंह यांचा सामना झाला. तेव्हा त्यांनी एक-मेकांना हात जोडून अभिवादनही केले.

हे दोन्ही नेते जेव्हा एकमेकांचे अभिवादन करत होते. तेव्हा तेथे राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाददेखील उपस्थित होते. यावेळी गुलाम नबी आझाददेखील हाताने काही इशारा करत असल्याचे दिसून आले. 

शिंदे आणि दिग्विजय सिंह ये दोघेही एकाच राज्यातील म्हणजे मध्यप्रदेशातील आहेत. याच वर्षाच्या मार्च महिन्यात जेव्हा शिंदे कमलनाथ सरकारविरोधात उभे राहिले, तेव्हा दिग्विजय सिंहानी उघडपणे कमलनाथांचे समर्थन केले होते. राज्यसभेची एक जागा, हेदेखील शिंदेंनी काँग्रेससोबत केलेल्या बंडखोरीचे कारण होते. याच जागेवर दिग्वीजय सिंह निवडून आले आहेत. राज्यसभेच्या या जागेसाठी आपले नाव घोषित व्हावे अशी शिंदेंची इच्छा होती. मात्र, काँग्रेसने दिग्विजय सिंहांना महत्व दिले. यामुळेदेखील शिंदे नाराज झाले होते.

याच पार्श्वभूमीवर होळीचा मुहूर्त साधत ज्योतिरादित्य शिंदे यांनी मोठी खेळी खेळत समर्थक आमदारांसह भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिंदेच्या या निर्णयामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आणि भाजपाने मध्यप्रदेशात सरकार स्थापन केले. यानंतर भाजपाने शिंदेंना राज्य सभेवर पाठवले आणि त्यांच्या सहकारी आमदारांना शिवराज सिंह चौहान सरकारच्या कॅबिनेटमध्ये चांगली पदेही दिली. 

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : अमेरिकेनं तयार केली कोरोनावरील व्हॅक्सीन? ट्रम्प यांचा मोठा दावा!

'या' वर्षी कोरोना लस येणार का?; खुद्द ऑक्सफर्डच्या डेव्हलपर्सनी दिले मोठे 'अपडेट'

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

CoronaVirus : वैज्ञानिकांचा दावा!; कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या 'या' औषधाने, फक्त 5 दिवसांत कोरोनाचा खात्मा

CoronaVirus : मानवी चाचणीच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत 'या' लसी; जाणून घ्या, केव्हापर्यंत होणार तयार?

आई शप्पथ!...रशियातील काही उद्योगपती, नेत्यांनी एप्रिलमध्येच घेतली कोरोनावरील लस

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाDigvijaya Singhदिग्विजय सिंहJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारRamdas Athawaleरामदास आठवले