शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय देशहिताचा, ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 20:19 IST

कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करून जम्मू काश्मीरचे विभाजनाला मंजुरी देणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे.

नवी दिल्ली -  कलम ३७० आणि कलम ३५ अ रद्द करून जम्मू काश्मीरचे विभाजनाला मंजुरी देणारे विधेयक राज्यसभा आणि लोकसभेमध्ये मंजूर झाले आहे. दरम्यान, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने राज्यसभेपाठोपाठ लोकसभेमध्येही कलम ३७० रद्द करण्यास जोरदार विरोध केला. मात्र काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते वैयक्तिकरीत्या केंद्र सरकारने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. आता राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तरुण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयास पाठिंबा दिला आहे. हा निर्णय देशहिताचा असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. कलम ३७० बाबत ज्योतिरादित्य शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, जम्मू-काश्मीर आणि लडाखबाबत उचलण्यात आलेली पावले आणि भारतामध्ये त्यांच्या पूर्णपणे करण्यात आलेल्या विलीनीकरणाचे मी समर्थन करतो. मात्र यासाठी घटनात्मक प्रक्रियेचे पूर्ण पालन केले गेले असते तर अधिक चांगले झाले असते. तसे झाले असते तर काही शंका उपस्थित झाल्या नसत्या. मात्र हा निर्णय देशहितासाठी घेतला गेला आहे. मी त्याला पाठिंबा देतो.''  

दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर आज लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे. गळवारी लोकसभेत जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याबद्दल वादळी चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी अनेक प्रश्न विचारत हे कलम रद्द करण्यास विरोध दर्शविला. यावेळी या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर यावर मतदान घेण्यात आले, असता  हे विधेयक  351 विरुद्ध 72 मताधिक्याने मंजूर करण्यात आले.  तत्पूर्वी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना उत्तर देताना पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे पाकव्याप्त काश्मीरची निर्मिती झाल्याचे सांगत काँग्रेसवर टीका केली. जम्मू-काश्मीरचा मुद्दा पंडित जवाहरलाल नेहरू संयुक्त राष्ट्र संघात नेला. त्यांनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 मर्यादित काळासाठी असल्याचे सांगितले. मात्र, ते हटवण्यासाठी 70 वर्षे लागली.

टॅग्स :congressकाँग्रेसArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-ए