शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये परत जाण्यास ज्योतिरादित्य शिंदे यांचा ठाम नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 04:32 IST

बातम्या बिनबुडाच्या असल्याची टीका । भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही

नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केलेले मध्य प्रदेशमधील महत्त्वाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही असे ठामपणे सांगितले आहे. तसेच भाजपला सोडचिठ्ठी देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. माझ्याबाबत सोशल मीडियावर झळकलेल्या सर्व बातम्या बिनबुडाच्या आहेत असेही शिंदे म्हणाले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी टिष्ट्वटरवरील आपल्या हॅशटॅगमधून भाजपचे नाव वगळले असून त्यामुळे ते आता लवकरच या पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशा बातम्या सोशल मीडियातून पसरल्या. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क लढविले जात होते. यासंदर्भात शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, ज्योतिरादित्य हे भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये जाणार ही चर्चा निरर्थक आहे. त्यांनी सोशल मीडियातील आपल्या बायोडेटात कोणतेही बदल केलेले नाहीत. ते क्रिकेटप्रेमी व जनतेचा सेवक असल्याचे आधीपासूनच त्यांच्या बायोडेटात लिहिलेले आहे व तो मजकूर आजही कायम आहे.टिष्ट्वटरवरील हॅशटॅगमधून भाजपचे नाव वगळल्याच्या बातम्यांबाबत ज्योतिरादित्य शिंदे यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, खोट्या बातम्या वाऱ्याच्या वेगाने पसरतात ही वाईट गोष्ट आहे. लोकांनी सत्य जाणून घ्यायला हवे. मध्य प्रदेशमधील व केंद्रातील सरकारच्या कामकाजाबद्दल तसेच पक्षाच्या कार्यक्रमांबद्दल ज्योतिरादित्य शिंदे सोशल मीडियातून लोकांना सातत्याने माहिती देत असतात. आपण भाजपचे नेते आहोत हे दर्शविणारे छायाचित्रही त्यांनी टिष्ट्वटरवरील प्रोफाइलवर झळकविले आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर-चंबळ, बुंदेलखंड, माळवा या आपल्या प्रभावक्षेत्रात विधानसभेच्या २४ जागांसाठी होणाºया पोटनिवडणुकांत भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा निर्धारही ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला आहे.नाराज नेत्यांकडून पसरविण्यात येतात अफवा?ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश त्या पक्षाच्या काही नेत्यांना रुचलेला नाही. शिंदे यांनी परत यावे असे काही काँग्रेस नेत्यांना वाटते. या दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून शिंदे यांच्याबद्दल उलटसुलट बातम्या व अफवा पसरविण्यात येतात अशी चर्चा आहे. यूपीए सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन मार्च महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मध्य प्रदेशात त्यांचे समर्थक असलेले २२ आमदारही भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे अल्पमतात गेलेले काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले.

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेcongressकाँग्रेसBJPभाजपा