शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रोख रकमेच्या प्रकरणात न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना सध्या दिलासा, एफआयआर दाखल करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 17:14 IST

१४ मार्च रोजी न्यायमूर्ती वर्मा यांच्या लुटियन्स दिल्ली येथील निवासस्थानाच्या स्टोअर रूममध्ये आग लागली, यानंतर मोठ्या प्रमाणात जळालेल्या नोटा सापडल्या.

काही दिवसापूर्वी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या निवासस्थानी आग लागली होती. यावेळी स्टोअर रुममधून मोठ्या प्रमाणात जळालेली रोख रक्कम सापडली होती. या प्रकरणात खटला दाखल करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणाची अंतर्गत समिती चौकशी करत आहे आणि अहवाल आल्यानंतर, सरन्यायाधीश यांच्याकडे कारवाई करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. या याचिकेचा विचार करणे योग्य होणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटले. 

न्यायमूर्ती अभय एस ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने वकिल मॅथ्यूज जे नेदुमपारा आणि हेमाली सुरेश कुरणे यांनी दाखल केलेल्या याचिकेला 'वेळेच्या आधी' म्हटले. खंडपीठाने म्हटले की, "अंतर्गत चौकशी सुरू आहे. जर अहवालात काही चूक आढळली तर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात किंवा प्रकरण संसदेकडे पाठवले जाऊ शकते. आज त्यावर विचार करण्याची वेळ नाही."

ऑपरेशनदरम्यान महिलेच्या पोटात कात्री राहिली, 17 वर्षांनंतर धक्कादायक प्रकार उघडकीस

सुप्रीम कोर्टात काय घडले?वकील नेदुम्परा यांनी दुसऱ्या प्रकरणाचा संदर्भ देत म्हटले की, केरळमध्ये काय झालं ते पाहा. POCSO प्रकरणात एका निवृत्त न्यायाधीशावर आरोप लावण्यात आले आणि पोलिस आरोपीचे नावही लिहू शकले नाहीत. आरोप गंभीर असताना. फक्त पोलिसच त्याची चौकशी करू शकतात. न्यायालये त्याची चौकशी करू शकत नाहीत," असे वकील नेदुमपारा यांनी इतर प्रकरणांचा संदर्भ देत सांगितले. यावर न्यायमूर्ती ओका म्हणाले, "कृपया अंतर्गत चौकशी प्रक्रिया सांगणारे दोन्ही निकाल वाचा. प्रक्रियेनंतर, सर्व पर्याय खुले आहेत."

त्यानंतर नेदुम्पारा यांनी युक्तिवाद केला, "सामान्य माणूस विचारत राहतो की १४ मार्च रोजी एफआयआर का दाखल केला गेला नाही, अटक का केली गेली नाही, जप्ती का केली गेली नाही, फौजदारी कायदा का लागू केला गेला नाही? हा घोटाळा उघड करण्यासाठी एक आठवडा का लागला? कॉलेजियमने असे का म्हटले नाही की त्यात व्हिडीओ आहेत इत्यादी."

खंडपीठाने म्हटले की, "आम्ही याचिका पाहिली आहे. हे प्रश्न उपस्थित केले  आहेत. आता अंतर्गत चौकशी सुरू आहे. पण या टप्प्यावर आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही आणि त्यानंतर भारताच्या सरन्यायाधीशांसमोर सर्व पर्याय खुले आहेत," असे खंडपीठाने म्हटले. नेदुम्पारा म्हणाले, "सामान्य माणसाला हे समजणार नाही." त्यानंतर न्यायमूर्ती ओका यांनी टिप्पणी केली, "तुम्ही सामान्य माणसाला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांबद्दल शिक्षित केले पाहिजे जे कायदा बनवतात."

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय