नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती रंजन गोगोई हे देशाचे भावी सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. मावळते सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी या पदासाठी रंजन गोगोई यांच्या नावाची शिफारस सरकारकडे केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती गोगोई हे 3 ऑक्टोबर रोजी पदाची शपथ घेतील. त्यांचा कार्यकाळ 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत राहील.
न्यायमूर्ती रंजन गोगोई असतील देशाचे भावी सरन्यायाधीश
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 20:35 IST