शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

न्या. लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 22:49 IST

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. लोकशाही धोक्यात असून, वेळीच खबरदारी घेतली पाहिजे.चार न्यायाधीशांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. यावर योग्य विचार होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटना याआधी कधीही घडल्या नाहीत. हे एक अभूतपूर्व प्रकरण आहे.  भारताच्या सर्व नागरिकांचं न्यायव्यवस्थेवर प्रेम आहे, न्यायाधीशांच्या प्रश्नांचं लवकरच निराकरण व्हायला हवं. न्या. लोया मृत्यू प्रकरणात योग्य चौकशी व्हावी, तसेच हे प्रकरण न्यायमूर्तींनी योग्य प्रकारे हाताळण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे. न्यायाधीशांच्या वादाचा लोकशाहीवर होणार परिणाम- सुरजेवालाकाँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनीही न्यायाधीशांच्या वादामुळे काँग्रेस अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. याचे लोकशाहीवर दूरगामी परिणाम होतीत. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूवरही न्यायाधीशांनी सवाल उपस्थित केले आहेत, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि पी. चिदंबरम सहभागी झाले होते.दोन महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही न्यायमूर्ती जे चेलमेश्वर यांच्या घरी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाचे प्रशासन गेल्या दोन महिन्यांपासून योग्यरित्या काम करत नसल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. जे चेलमेश्वर यांच्याबरोबर रंजन गोगोई, माधव बी लोकूर आणि कुरीयन जोसेफ या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली.  सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनंतर दुस-या क्रमांकावर असलेले जे चेलमेश्वर यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचं म्हटलं. पहिल्यांदाच न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागत असल्याचं ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाचं प्रशासन नीट काम करत नाही असं म्हणत त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कामकाजावरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही आमचा आत्मा विकला असं उद्या कोणी म्हणू नयेसुप्रीम कोर्टाचा गेल्या दोन महिन्यातील कारभार व्यथित करणारा आहे. काही महिन्यांपासून सुप्रीम कोर्ट प्रशासन नीट काम करत नाही, कारभार व्यवस्थित चालत नाही.  यापूर्वी न्यायव्यवस्थेत अशा प्रकारच्या गोष्टी कधीच घडल्या नाहीत. याबाबत सरन्यायाधीशांसोबतही बोललो पण काही उपयोग झाला नाही'' अशा शब्दांमध्ये आज सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कारभारावर हल्लाबोल केला.

गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरणSohrabuddin Sheikh encounter caseसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरण