शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अभिनंदन यांच्या सुटकेनंतर मोदींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 17:43 IST

अभिनंदनच्या सुटकेबद्दल भाष्य करत मोदींचा पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा

नवी दिल्ली: हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत केली. अभिनंदन यांच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विज्ञान भवनात भाष्य केलं. एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता. तो पूर्ण झाला, असं मोदी म्हणाले. यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता. आता फक्त प्रॅक्टिस सुरू आहे. खरं काम नंतर करायचं आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी अभिनंदन यांच्या सुटकेवर भाष्य करत पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला. दिल्लीच्या विज्ञान भवनात शांती स्वरुप भटनागर पुरस्कार सोहळ्यात मोदींनी भाषण केलं. मोदींचं भाषण सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका होणार असल्याचं वृत्त आलं. 'भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत,' अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केली.बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलानं चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली. यासाठी पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता. भारताच्या या प्रयत्नांना आज यश आलं.आज पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली. 'भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत. मात्र पाकिस्तानने उचललेल्या या पावलाला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. तसंच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे मूळ हे काश्मीर आहे,' असा दावाही इम्रान खान यांनी केला.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानindian air forceभारतीय हवाई दलPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक