जुन्नर तालुक्यात आदिवासी शेतमजूर संख्या वाढली
By Admin | Updated: September 26, 2015 19:26 IST2015-09-26T19:26:37+5:302015-09-26T19:26:37+5:30
आळेफाटा : भात कापणीला वेळ असल्याने आदिवासी शेतमजूर मोठे संख्येने कामाच्या शोधात जुन्नर तालुक्यात विशेषत: आळेफाटा येथे येऊ लागले आहेत. साद्रीच्या पर्वत रांगेतील परिसरात असलेल्या तालुक्यातील आदिवासी शेतमजूर नेहमीच बागायती शेती असलेल्या जुन्नर तालुक्यात मोठ्या संख्येने कामाच्या शोधात येत असतात.

जुन्नर तालुक्यात आदिवासी शेतमजूर संख्या वाढली
आ ेफाटा : भात कापणीला वेळ असल्याने आदिवासी शेतमजूर मोठे संख्येने कामाच्या शोधात जुन्नर तालुक्यात विशेषत: आळेफाटा येथे येऊ लागले आहेत. साद्रीच्या पर्वत रांगेतील परिसरात असलेल्या तालुक्यातील आदिवासी शेतमजूर नेहमीच बागायती शेती असलेल्या जुन्नर तालुक्यात मोठ्या संख्येने कामाच्या शोधात येत असतात. या तालुक्यात मराठवाड्यातील शेतमजूरही कामासाठी येतात. दरम्यान, भात कापणीला वेळ असल्याने दोन पैसे मिळतील. या अपेक्षेने सध्या हे शेतमजूर मोठ्या संख्येने तालुक्यात येऊ लागले आहेत. कांदा लागवडी व रब्बी हंगामातील कामे सध्या उपलब्ध असल्याने या मजुरांना शेतकरीवर्गाकडून मागणी वाढली आहे. फोटो ओळी. कामाच्या शोधात आळेफाटा येथे आलेले शेतमजूर.