पीएमओत ज्युनिअर मिश्रांची ‘वट’

By Admin | Updated: July 29, 2014 02:16 IST2014-07-29T02:16:02+5:302014-07-29T02:16:02+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिरिक्त सचिव डॉ. पी.के. मिश्रा (ज्युनिअर मिश्रा )अलीकडेच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालयात(पीएमओ) सशक्त बनले आहेत.

Junior Mishra's 'VAT' in PMO | पीएमओत ज्युनिअर मिश्रांची ‘वट’

पीएमओत ज्युनिअर मिश्रांची ‘वट’

हरीश गुप्ता, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिरिक्त सचिव डॉ. पी.के. मिश्रा (ज्युनिअर मिश्रा )अलीकडेच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पंतप्रधान कार्यालयात(पीएमओ) सशक्त बनले आहेत.
प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांचे अधिकार कमी करण्यात आले असून गुजरातहून आलेले ज्युनिअर मिश्रा पीएमओमध्ये नवे शक्तिकेंद्र बनले असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी लोकमतला माहिती देताना सांगितले. पायाभूत क्षेत्र आणि विकासासंबंधी सर्व प्रकरणे नृपेंद्र मिश्राच हाताळणार असून ते विविध मंत्रालये आणि विभाग तसेच राज्य सरकारे आणि विदेशी सरकारांशी समन्वय राखण्याचे कामही पाहतील. ते यंत्रणा सुधारण्यासह ऊर्जा क्षेत्रावर भर देतील.
दुसरीकडे डॉ. पी.के. मिश्रा यांच्याकडे मंत्रिमंडळ समिती स्तरावरील सर्व नियुक्त्या, मंत्रिमंडळाच्या सर्व बैठकींना हजर राहणे, मंत्रालयाच्या कामांमधील समन्वय, मंत्रिमंडळाच्या बैठकींच्या अजेंड्याचे दस्तऐवज तयार करणे, थेट पंतप्रधानांच्या अखत्यारितील येणाऱ्या सर्व मंत्रालयाशी संबंधित कामकाजासह प्रशासनाची जबाबदारी अशी महत्त्वपूर्ण कामे असतील. त्यांना सचिवांच्या बैठका बोलावण्याचा अधिकारही बहाल करण्यात आला आहे. ट्रायमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे कायद्यानुसार कोणतीही जबाबदारी सोपविता आली नसती मात्र त्यांची नियुक्ती नियमित करण्यासाठी मोदींनी राष्ट्रपतींना वटहुकूम जारी करायला भाग पाडले याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात होते, राजकीय वर्तुळात हा वादाचा विषयही ठरला. तथापि वटहुकूम जारी केल्यानंतर मोदींनी पीएमओमध्ये अतिरिक्त सचिव हे नवे पद तयार केले. या जागेवर त्यांनी गुजरातमधील निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. पी.के.मिश्रा यांना आणले.
डॉ.मिश्रा यांनी गुजरातमध्ये मोदींचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे. नव्या व्यवस्थेत डॉ. मिश्रा यांच्याकडे सूत्रे एकवटली आहेत. सामान्यपणे पंतप्रधानांचे प्रधान सचिव हेच पॉवरफुल मानले जातात. देशभरातील सर्व अधिकारी त्यांच्याकडेच अहवाल सोपवित असतात. ते पंतप्रधानांचे कान आणि डोळे म्हणून काम करीत असतात असे मानले जाते.

Web Title: Junior Mishra's 'VAT' in PMO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.