जंगलबुकची भारतात सैराट कमाई, २०० करोडच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला परदेशी चित्रपट
By Admin | Updated: May 29, 2016 16:22 IST2016-05-29T16:22:27+5:302016-05-29T16:22:27+5:30
जंगल जंगल बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहनके फूल खिला है, फूल खिला है. १९९३ साली दूरदर्शन वाहिनीवर दर रविवारी हे गाणं घरोघरी ऐकू यायचं.

जंगलबुकची भारतात सैराट कमाई, २०० करोडच्या क्लबमध्ये सामील होणारा पहिला परदेशी चित्रपट
>ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि. २९ : जंगल जंगल बात चली है, पता चला है, अरे चड्डी पहनके फूल खिला है, फूल खिला है. १९९३ साली दूरदर्शन वाहिनीवर दर रविवारी हे गाणं घरोघरी ऐकू यायचं. चित्रवाणीच्या संचाचा आणि तमाम बच्चे कंपनीचा ताबा जंगलबुक मालिकेतील मोगली घ्यायचा. त्याच हॉलीवूडच्या द जंगल बुक या चित्रपटात नवीन कांहीही नसताना भारतीय बॉक्स ऑफिसवर छप्परतोड सैराट कमाई केली आहे. यापूर्वी या विषयावरची टीव्ही सिरीयल भारतात आली होती तीच कथा घेऊन हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. तरीही प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिल्याने तो इंडियन बॉक्स ऑफिसवर २०० कोटींची कमाई करणारा पहिलाच हॉलीवूड चित्रपट ठरला आहे.
भारतात हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमीळ व तेलगू अशा चार भाषांत प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या १० दिवसांतच त्याने १०० कोटींची कमाई केली व आता चौथ्या आठवड्यातही तो दमदार कमाई करत आहे. ५० दिवसानंतर त्याची कमाई २०० कोटींच्या घरात पोहचली आहे. ऐवढी कमाई करणारा तो पहिलाच हॉलिवूडपट आहे. नील सेठी या भारतीय वंशाच्या अमेरिकन मुलांने यात मोगलीची भूमिका केली आहे. हिंदी आवृत्तीसाठी प्रियंका चोप्रा, नाना पाटेकर, ओम पुरी, इरफानखान यांनी आवाज दिले आहेत.