जम्मु पोलीस अधिक्षकांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू

By Admin | Updated: February 20, 2015 18:27 IST2015-02-20T18:27:52+5:302015-02-20T18:27:52+5:30

पोलीस अधिक्षक सुनील गुप्ता यांचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाला. शुक्रवारी अधिक्षक सुनील गुप्ता यांचा वैद्यकीय अहवाल आल्यावर त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लू ने झाल्याचे स्पष्ट झाले.

Jummi police superintendents die by swine flu | जम्मु पोलीस अधिक्षकांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू

जम्मु पोलीस अधिक्षकांचा स्वाईन फ्लू ने मृत्यू

ऑनलाइन लोकमत

जम्मु, दि. २० -  पोलीस अधिक्षक सुनील गुप्ता यांचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाला.
शुक्रवारी अधिक्षक सुनील गुप्ता यांचा वैद्यकीय अहवाल आल्यावर त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लू ने झाल्याचे स्पष्ट झाले. 
त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वाईन फ्लू ची तपासणी केली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी आजार गंभीर असल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात त्वरित दाखल होण्यास सांगितले होते. परंतू कालांतराने अधिक्षक गुप्ता श्री चंद्र वैद्यकिय महाविद्यालयात उपचाराकरता दाखल झाले. बुधवारी रात्री श्वसनाचा त्रास अधिक बळावल्याने ते दगावले असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. परंतू, त्यांच्या मृत्यूचे अधिकृत कारण वैद्यकीय अहवाल आल्यावर स्पष्ट होईल असे डॉ. एस.एस. सुदन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गुप्ता यांनी स्वाईन फ्लूची तपासणी केल्याचेही त्यांनी मान्य केले. सुनील गुप्ता हे जम्मु येथे पोलीस प्रशान विभागात अधिक्षक म्हणून कार्यरत होते.

Web Title: Jummi police superintendents die by swine flu