सतीश पाटलांसह दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जे.टी. महाजन सूतगिरणी प्रकरण : न्यायालयाने मागवला पोलीस प्रशासनाचा खुलासा

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:32+5:302016-04-26T00:16:32+5:30

जळगाव : जे.टी. महाजन सूतगिरणी प्रकरणात जिल्हा बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्‘ात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून बॅँकेचे तत्कालीन चेअरमन तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्यासह तत्कालीन व्यवस्थापक सुधाकर झिपरू पाटील यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दाखल केला.

JT for anticipatory bail application with Satish Patil Mahajan Sutragiri Case: The Court has asked the police administration to disclose | सतीश पाटलांसह दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जे.टी. महाजन सूतगिरणी प्रकरण : न्यायालयाने मागवला पोलीस प्रशासनाचा खुलासा

सतीश पाटलांसह दोघांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज जे.टी. महाजन सूतगिरणी प्रकरण : न्यायालयाने मागवला पोलीस प्रशासनाचा खुलासा

गाव : जे.टी. महाजन सूतगिरणी प्रकरणात जिल्हा बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्‘ात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून बॅँकेचे तत्कालीन चेअरमन तथा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्यासह तत्कालीन व्यवस्थापक सुधाकर झिपरू पाटील यांनी सोमवारी न्यायालयात अर्ज दाखल केला.
जे.टी. महाजन सूतगिरणी (यावल) खरेदीसाठी निविदेद्वारे भरलेली २ कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाइल्सला नियमबा‘ परत करून जिल्हा बॅँकेची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आमदार डॉ.सतीश पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध ॲड.विजय भास्करराव पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्‘ात अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून सोमवारी प्रथम सत्रात आमदार पाटलांसह सुधाकर पाटील यांनी न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने सरकार पक्षाकडून पोलिसांचा खुलासा मागवला आहे. याप्रकरणी २६ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. आमदार सतीश पाटील यांच्यातर्फे ॲड.कुणाल पवार व ॲड.व्ही.आर. ढाके तर सुधाकर पाटील यांच्यातर्फे ॲड.प्रवीण पांडे व ॲड.हिंमत सूर्यवंशी हे कामकाज पाहत आहेत.

Web Title: JT for anticipatory bail application with Satish Patil Mahajan Sutragiri Case: The Court has asked the police administration to disclose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.