शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

वक्फ विधेयकावर JPC ची 6 तास बैठक; विरोधी खासदारांनी उघडपणे व्यक्त केली तीव्र नाराजी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 19:56 IST

Waqf Bill: वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 चे परीक्षण करण्यासाठी सरकारने संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली आहे.

JPC On Waqf Amendment Bill 2024 : अलीकडेच केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 (Waqf Amendment Bill 2024) वर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची (JPC) गुरुवारी (22 ऑगस्ट) दिल्लीतील संसद भवनात बैठक झाली. सुमारे सहा तास चाललल्या या बैठकीत वक्फ विधेयकावर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी विरोधी खासदारांनी नाराजी व्यक्त केली

विरोधी खासदार काय म्हणाले?मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेपीसीच्या बैठकीत बहुतांश सदस्य अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सादरीकरणावर असमाधानी होते आणि त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. मंत्रालयातील लोकप्रतिनिधी स्वत: तयारी करुन आले नाहीत, त्यांना या विधेयकातील गोष्टी नीट समजावूनही सांगता येत नाहीत, अशी प्रतक्रिया विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिली. याशिवाय, हा कायदा धार्मिक स्वातंत्र्य, समानता, कलम 26 आणि इतर अनेक कायद्यांचे उल्लंघन आहे.

बैठक बरखास्त बैठकीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयक फेटाळले. महत्वाची बाब म्हणजे, वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 वर संसदेतही मोठा गदारोळ झाला होता.

समितीचे अध्यक्ष कोण आहेत?विरोधी पक्ष आणि मुस्लिम संघटनांच्या तीव्र विरोधानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 चे परीक्षण करण्याची जबाबदारी 31 सदस्यीय समितीकडे सोपवण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जगदंबिका पाल या समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती वक्फ विधेयकावर विचारमंथन करेल आणि संसदेच्या पुढील अधिवेशनात आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करेल. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारParliamentसंसदBJPभाजपाcongressकाँग्रेसAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन