शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

Assembly Elections 2022: '4 राज्यात भाजपची सत्ता येणार, यूपीमध्ये 300+ जागा जिंकणार';जेपी नड्डांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:08 IST

Assembly Elections 2022: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत, यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत.

नवी दिल्ली: सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत. यात सर्वांच्या नजरा उत्तर प्रदेशावर लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा(JP Nadda) यांनी दावा केला आहे की, भाजप पाचपैकी चार राज्यांमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करेल. त्यांच्या मते, सध्या ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे तेथे सत्ताविरोधी घटक नाही.

न्यूज18इंडियाला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डा म्हणतात की, चार राज्यांमध्ये लाट आमच्या बाजूने आहे. उत्तर प्रदेशात तर भाजप 300 हून अधिक जागा जिंकेल. गोवा आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले असून, यूपीमध्ये चार फेऱ्यांचे मतदान झाले आहे. तर मणिपूरमध्ये दोन्ही टप्प्यात निवडणूक होणे बाकी आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.

आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात

नड्डा पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालप्रमाणे उत्तर प्रदेशात निकाल येणार नाहीत. भाजपने बंगालमध्ये पक्ष मजबूत केला, पण उत्तर प्रदेशात आधीच पक्ष मजबूत आहे. बंगालमध्ये पक्ष 3 वरुन 77 जागांवर पोहोचल्या, हीदेखील मोठे यश आहे. मुस्लिमांना भाजपची भीती का वाटते, असे विचारले असता नड्डा म्हणाले, आम्ही तुष्टीकरणाच्या विरोधात आहोत. सर्वांचा विकास हेच आमचे ध्येय आहे. जन धन, सौभाग्य आणि उज्ज्वला सर्वांसाठी समान आहेत.

अखिलेशवर निशाणा जेपी नड्डा यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अखिलेश तुष्टीकरणाचे राजकारण करतात. अखिलेश यादव यांची राजकीय समज मर्यादित आहे. त्यांचा दहशतवाद्यांना वाचवण्याचा इतिहास आहे. अखिलेश यांनी बॉम्बस्फोटांचे आरोपी मोकळे केले. सायकलवर मतदान म्हणजे दहशतवाद्यांच्या समर्थकाला मत. समाजवादी पक्षाने नेहमीच संधीसाधू युती केली. 

अखिलेशच्या राजवटीत दंगली झाल्यानड्डा म्हणाले की, योगी आदित्यनाथ जे काही बोलले ते खरे आहे. अखिलेश सरकारच्या काळात 200 दंगली झाल्या. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आमचा विश्वास आहे. भाजपला मुस्लिमांचाही पाठिंबा मिळेल. व्होट बँकेचे राजकारण हे विरोधकांचे काम आहे, असे ते म्हणाले. तसेच, नड्डा यांनी प्रियांका गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, चांदीचा चमचा घेऊन जन्मलेले लोक गंभीर नसतात, असा टोलाही लगावला.  

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाPunjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२