पत्रकार, साहित्यिकांनी शेतकर्यांचे दु:ख मांडावे- कदम
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:11+5:302015-02-14T23:50:11+5:30
नांदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़

पत्रकार, साहित्यिकांनी शेतकर्यांचे दु:ख मांडावे- कदम
न ंदेड: पत्रकार हे साहित्यिकांचे कवचकुंडल असून पत्रकारांनी अनंत भालेराव, रामनाथ गोयंका यांचा आदर्श समोर ठेवून शेतकर्यांचे दु:ख जगासमोर मांडावे, असे आवाहन मराठवाडा साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री कमलकिशोर कदम यांनी केले़ ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते़ ते म्हणाले, शेतकर्यांच्या प्रश्नावर विचार करणारे संमेलन असल्यामुळे याठिकाणी साहित्यिक व पत्रकारांनी शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी चर्चा करावी़ शेतकरी जगला पाहिजे हा सल्ला आम्ही ऐकतो़ ज्याच्या आधारावर आम्ही जगायचे तो निसर्गच सरकारसारखा वागत असेल तर कसे व्हायचे़ अशा या अनिश्चित वातावरणात शेतीचा व्यवसाय अवलंबून आहे़ सरकारच्या बजेटमध्ये ७० टक्के बजेट हे वेतनावर, १५ टक्के सेवानिवृत्तधारकांच्या पेन्शनवर खर्च होते़ तसेच महानगरांच्या विकासासाठी हजारो कोटी खर्च करण्यात येतात़ परंतु शेतकर्यांना काही मिळत नाही़ याविषयी पत्रकार, साहित्यिकांनी विचार केला पाहिजे़ सत्ताधिश जेव्हा अन्याय करतात तेव्हा पत्रकारितेची खरी कस लागत असते़ मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले, मराठवाडा हे साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत आहेत़ तेव्हा आंबेजोगाई येथे मराठीसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी आहे़ यापूर्वीच्या सरकारकडून या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही़ परंतु या सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे़ प्रत्येक साहित्य संमेलन हे शेतकर्यांच्या प्रश्नाशी जोडले गेल्याचेही ठाले म्हणाले़ भारत सासणे यांनी साहित्यिकांची भूमिका सर्वसामान्य माणसांच्या बाजुने असावी, असे सांगितले़