जोड - मुख्याध्यापकपदी बढतीत सेवाज्येष्ठतेपेक्षा प्रवर्गाच्या क्रमवारीचा निकष बंधनकारक
By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30
चौकट.....

जोड - मुख्याध्यापकपदी बढतीत सेवाज्येष्ठतेपेक्षा प्रवर्गाच्या क्रमवारीचा निकष बंधनकारक
च कट.....सेवाज्येष्ठता पाळणारा आदेश रद्दएका सहायक शिक्षकाला सेवाज्येष्ठतेच्या आधारावर मुख्याध्यापकपदासाठी पात्र ठरविणारा शालेय लवादाचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. लाखांदूर (भंडारा) येथील भारतीय शिक्षण संस्थेच्या एका शाळेतील मुख्याध्यापकपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. या प्रवर्गातील सहायक शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील अर्जुन राठोड यांची नियुक्ती करण्यात आली होती. सेवाज्येष्ठतेत वरिष्ठ असलेले भटक्या जमाती (ब) प्रवर्गातील वसंत शिंदे यांनी या नियुक्तीला शालेय लवादात आव्हान दिले. १८ जून २०१४ रोजी लवादाने त्यांची याचिका मंजूर केली होती. महाराष्ट्र खासगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियमन नियम-१९८१ मधील नियम ९(१०)(ए) मध्ये विमुक्त जाती (अ) प्रवर्ग तिसऱ्या तर, भटक्या जमाती (ब) प्रवर्ग चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे सेवाज्येष्ठतेचा मुद्दा महत्त्वाचा नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने लवादाचा निर्णय रद्द करताना नोंदविले आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. गौरव बेलसरे व ॲड. पी.पी. ठाकरे यांनी बाजू मांडली.