मुख्य १ साठी जोड जिल्हा बँकेसाठी दोन्ही काँग्रेसचे पॅनल ईश्वरलाल जैन : २४ रोजी दुपारी पॅनलमधील नावे जाहीर करणार
By Admin | Updated: April 24, 2015 00:55 IST2015-04-24T00:55:17+5:302015-04-24T00:55:17+5:30
जळगाव- जिल्हा बँकेची निवडणूक तापू लागली असून, सर्वपक्षीय पॅनलमध्ये उभी फूट पडली आहे. अर्थातच या पॅनलमधून खासदार ईश्वरलाल जैन वेगळे झाले असून, खासदार जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांचे पॅनल २४ रोजी दुपारी ३ वाजेनंतर जाहीर केले जाईल, अशी भूमिका मांडली आहे.

मुख्य १ साठी जोड जिल्हा बँकेसाठी दोन्ही काँग्रेसचे पॅनल ईश्वरलाल जैन : २४ रोजी दुपारी पॅनलमधील नावे जाहीर करणार
ज गाव- जिल्हा बँकेची निवडणूक तापू लागली असून, सर्वपक्षीय पॅनलमध्ये उभी फूट पडली आहे. अर्थातच या पॅनलमधून खासदार ईश्वरलाल जैन वेगळे झाले असून, खासदार जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांचे पॅनल २४ रोजी दुपारी ३ वाजेनंतर जाहीर केले जाईल, अशी भूमिका मांडली आहे. यासंदर्भात खासदार जैन म्हणाले की, सर्वपक्षीय पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची गळचेपी होत होती. खच्चीकरण कार्यकर्त्यांचा होत होते. ते सहन कसे करणार. यासंबंधी माजी खासदार ॲड.वसंतराव मोरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांशी चर्चा केली. मगच जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र पॅनल स्थापन करून लढण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसलाही स्थानपॅनल फक्त राष्ट्रवादीचेच नसेल. त्यात आमच्यात येण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेसच्या मंडळीलाही स्थान असेल. दोन्ही काँग्रेसचे पॅनल असणारच असेही खासदार जैन यांनी सांगितले.