Joe Biden Wins 2020 US Election: पंतप्रधान मोदींकडून जो बायडन यांचं अभिनंदन; फोटो शेअर करत म्हणाले...

By मुकेश चव्हाण | Published: November 8, 2020 01:18 AM2020-11-08T01:18:04+5:302020-11-08T07:00:53+5:30

जो बायडन यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत अभिनंदन केले आहे. 

Joe Biden Wins 2020 US Election: Indian Prime Minister Narendra Modi also tweeted congratulations After Joe Biden's victory | Joe Biden Wins 2020 US Election: पंतप्रधान मोदींकडून जो बायडन यांचं अभिनंदन; फोटो शेअर करत म्हणाले...

Joe Biden Wins 2020 US Election: पंतप्रधान मोदींकडून जो बायडन यांचं अभिनंदन; फोटो शेअर करत म्हणाले...

Next

नवी दिल्ली/वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी निर्णायक आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाल होते. आता, या निवडणुकीत जो बायडन यांनी विजय मिळवला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते लवकरच पदभार स्विकारणार आहेत. सीएनएनने जो बायडन यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडीचे वृत्त दिले आहे. जो बायडन यांच्या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत अभिनंदन केले आहे. 

नरेंद्र मोदी ट्विट करत म्हणाले की, तुम्ही मिळवलेल्या नेत्रदीपक विजयासाठी तुमचे मनपूर्वक अभिनंदन, याआधी तुम्ही उपराष्ट्राध्यक्षपदी काम करत असताना भारत-अमेरिका संबंध दृढ करण्यादृष्टीने तुमची भूमिका निर्णायक आणि मोलाची होती. त्यामुळे आता देखील भारत आणि अमेरिकेच्या संबंधांना आणखी उंचावर नेण्यासाठी एकत्र मिळून काम करु अशी अपेक्षा करतो, असं नरेंद्र मोदींनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेतील निवडणुकांत मोठ्या प्रमाणात झालेल्या टपाली मतदानाची मोजणी सुरू असून ती पूर्ण झाल्याखेरीज अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल लागला, असे समजले जाऊ नये, असे ट्रम्प यांचे म्हणणे होते. मात्र, बायडेन यांनी घेतलेल्या आघाडीमुळे तेच अध्यक्ष होतील, अशी चिन्हे दिसून येते होती. या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित अध्यक्षांना जी सुरक्षाव्यवस्था पुरवली जाते, तशी सुरक्षा बायडेन यांना देण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसच्या अतिरिक्त तुकड्या डेलावेअरला रवानाही झाल्या आहेत. आता, बायडन यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे, उपराष्ट्राध्यक्षपदी कमला हॅरीस यांची वर्णी लागणार आहे. 

Web Title: Joe Biden Wins 2020 US Election: Indian Prime Minister Narendra Modi also tweeted congratulations After Joe Biden's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.