शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

ब्लू व्हेलच्या नादात आत्महत्या करण्यापासून वाचवलेल्या जोधपूरमधील मुलीचा पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 11:58 IST

ब्लू व्हेल गेमच्या नादात जोधपूरमधील मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देब्लू व्हेल गेमच्या नादात जोधपूरमधील मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. पहिल्या वेळी आत्महत्या करण्यापासून त्या मुलीला वाचविण्यात आलं होतं. पण या मुलीने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न प्रयत्न केला. झोपेच्या गोळ्या खाऊन दहावीत शिकणाऱ्या या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

जोधपूर, दि. 7-  आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ब्ल्यू व्हेल गेमने गेल्या काही दिवसांपासून जगभरात धुमाकूळ  घातला आहे. हा गेम खेळताना भारतातही काही मुलांनी आत्महत्या करून आपला जीव गमावला आहे.. ब्लू व्हेल गेमच्या नादात  जोधपूरमधील मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे गेमच्या नादात पहिल्या वेळी आत्महत्या करण्यापासून त्या मुलीला वाचविण्यात आलं होतं. पण या मुलीने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न प्रयत्न केला.  झोपेच्या गोळ्या खाऊन दहावीत शिकणाऱ्या या मुलीने दुसऱ्यांदा त्महत्येचा प्रयत्न केला आहे. ब्लू व्हेल गेमच्या शेवटच्या टास्कपर्यंत पोहचल्याने तिने सोमवारी रात्री पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा त्या मुलीने आधी तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता .पण त्यावेळी पोलिसांनी आणि काही लोकांनी तिला तलावाबाहेर खेचून वाचवलं. पण त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा तिने पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न केला.

जोधपूरमधील या 17 वर्षीय मुलीवर सध्या शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तिच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोधपूरमध्ये असलेल्या कैलना तलावात या मुलीने पहिल्यांदा सोमवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. पण तेव्हा पोलिसांनी तिला वाचवलं. माझ्या आईच्या जीवाला धोका आहे त्यामुळे मला वाचवू नका, अशी विनंती त्या मुलीने पोलिसांकडे केली होती. आत्महत्येचा प्रयत्न दोन वेळा फसल्याने पीडित मुलगी मानसिक ताणात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. मंगळवारी या मुलीला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा ती कुणाशीही बोलत नव्हती. पण काहीवेळानंतर ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात ती कशी फसली हे तिने सांगितलं. असं डॉ. के.आर दौकिया यांनी सांगितलं.

ब्ल्यू व्हेल गेम खेळणाऱ्या युवकाने कथन केला अंगावर काटा आणणारा अनुभव मरणाच्या टोकापर्यंत नेणारा हा गेम खेळण्यापासून परावृत्त करण्यात आलेल्या एका तरुणाने ब्ल्यू व्हेल गेम खेळतानाचा आंगावर काटा आणणारा अनुभव कथन केला.तामिळनाडूमधील कराईकल जिल्ह्यातील अलेक्झँडर मंगुलिवा या २२ वर्षीय तरुणाला  पोलिसांनी ब्ल्यू व्हेल खेळाच्या जाळ्यातून बाहेर काढलं. ब्ल्यू व्हेल गेम खेळताना आलेल्या थरारक अनुभवाबाबत मंगुलिवा म्हणतो,  आपल्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी एक व्हॉट्स अॅप ग्रुप बनवला होता. दोन आठवड्यांपूर्वी या ग्रुपमध्ये मला ब्ल्यू व्हेल गेमसंदर्भातील एक लिंक मिळाली. सुट्टी घेऊन नेरावी या माझ्या गावी आलो असताना मी हा गेम खेळण्यास सुरुवात केली. मात्र हा गेम खेळण्यास सुरुवात केल्यावर मी चेन्नईत कामावर माघारी गेलो नाही."" हा असा खेळ आहे ज्याचे अॅडमिन गेम खेळणाऱ्या व्यक्तीच्या हिशेबाने तो तयार करतात. यात असे टास्क दिले जातात. जे रात्री दोन वाजल्यानंतर पूर्ण करणं आवश्यक असतं. सुरुवातीचे काही दिवस मला वैयक्तिक माहिती आणि फोटो टाकण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर एकेदिवशी मध्यरात्री स्मशानात जाऊन ऑनलाइन सेल्फी काढण्यास सांगितलं गेलं. "या गेममधील पुढील टास्कमध्ये काही भयावह चित्रपट बघण्यास सांगितले गेले. या गेमच्या प्रभावामुळे मी घरातल्या लोकांशी बोलणं बंद केलं. स्वत:ला  खोलीत कोंडून घेण्यास सुरुवात केली. या खेळाने हळुहळु माझ्या मेंदूचा ताबा घेतला होता. मला हा खेळ खेळणे बंद करायचं होतं. पण मी तसं करू शकलो नाही."सुदैवाने अलेक्झँडरचे बदललेलं वर्तन त्याच्या भावाच्या लक्षात आलं. त्याने प्रसंगावधान राखून यासंदर्भातील कल्पना पोलिसांना दिली. पोलिसही तातडीने सूत्रं हलवत अलेक्झँडरच्या घरी दाखल झाले. तेथे त्यांनी हातावर चाकूने मासा काढत असताना अलेक्झँडरला पकडले आणि त्याचे समुपदेशन सुरू केलं होतं.  

टॅग्स :Blue Whaleब्लू व्हेल