शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! रात्री नवरदेवाने आई तर सकाळी बाबा गमावले; सिलिंडरच्या स्फोटात 22 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 12:44 IST

Gas Cylinder Blast : सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढून 22 वर गेला आहे. तसेच अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी जोधपूरमध्ये आग लागून मोठी दुर्घटना घडल्याचं समोर आलं होतं. लग्न सोहळ्यात वरात निघण्याआधीच गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर तब्बल 60 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या भाजले होते. सर्व जखमींना उपचारासाठी जोधपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. यानंतर आता जखमींपैकी 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

सिलिंडर स्फोटातील मृतांचा आकडा आता वाढून 22 वर गेला आहे. तसेच अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये नवरदेवाच्या आई-वडिलांचा देखील समावेश आहे. नवरदेवाच्या आईचा रात्री तर वडिलांचा सकाळी मृत्यू झाला आहे. तसेच मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा अधिक समावेश आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना सिलिंडरचा स्फोट

सिलिंडरच्या ब्लास्टने क्षणात होत्याचं नव्हतं झालं, एक हसतं खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना अचानक गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यानंतर घटनास्थळी मोठा गोंधळ झाला होता. तर मंडपात असलेले लोक आगीत होरपळले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. जोधपूरमधील भूंगरा गावात ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले होते. 

22 जणांनी गमावला जीव

भूंगराचे रहिवासी असलेले सगत सिंह गोगादेव यांच्या मुलाचं गुरुवारी लग्न होतं. संध्याकाळी वरात येणार होती. त्यासाठी घरामध्ये पाहुणेमंडळी देखील होते. नातेवाईकांसाठी खास मेजवाणीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच दरम्यान सिंलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत काही लोक गंभीररित्या होरपळले. सिलिंडर स्फोटमुळे घराचे छतही कोसळले. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत एकूण 22 जणांनी आपला जीव गमावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटmarriageलग्न