शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Job Alert: दिवाळी रोजगाराची! पंतप्रधान मोदी तरुणांना देणार 75000 नोकऱ्या, या दिवशी करणार घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 14:08 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते तब्बल 75 हजार तरुणांना रोजगाराचे गिफ्ट देणार आहेत...

रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही दिवाळी आनंदाची बातमी घेऊन येत आहे. कारण यावेळची दिवाळी रोजगाराची असणार आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात हजारो नोकऱ्यांची घोषणा करणार आहेत. विशेष म्हणजे, पुढील वर्षातील डिसेंबर अखेरपर्यंत 10 लाख नोकऱ्या तयार केल्या जातील, असे पंतप्रधान मोदी यांनी जूनमध्येच म्हटले होते.

माध्यमांतील वत्तांनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 ऑक्टोबरला म्हणजेच दिवाळीच्या दोन दिवस आधी, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते तब्बल 75 हजार तरुणांना रोजगाराचे गिफ्ट देणार आहेत. महत्वाचे म्हणजे, विविध मंत्रालये आणि सरकारी खात्यात 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असल्याचे समजते.

कुठे-कुठे मिळाणार नोकऱ्या? -यात तरुणांसाठी संरक्षण मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, पोस्ट विभाग, गृह मंत्रालय, कामगार आणि रोजगार मंत्रालय, CISF, CBI, कस्टम, बँकिंग यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकऱ्या जाहीर केल्या जातील. देशातील अनेक केंद्रीय मंत्रीही या कार्यक्रमात सहभागी होतील.

हे मंत्री होणार सहभागी- या कार्यक्रमात ओडिशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, गुजरातचे आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, चंदीगडमधून माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, महाराष्ट्राचे पीयूष गोयल, राजस्थानचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, तामिळनाडूच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन, उत्तर प्रदेशचे अवजड उद्योग मंत्री महेंद्र पांडे, झारखंडचे आदिवासी व्यवहार मंत्री अर्जुन मुंडा, बिहारचे पंचायती राज मंत्री गिरिराज सिंह उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय, इतरही काही मंत्री वेग-वेगळ्या शहरांतून कार्यक्रमात भाग घेणार आहेत. तसेच सर्व खासदार आपापल्या कार्यक्षेत्रातून सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Employeeकर्मचारीNarendra Modiनरेंद्र मोदी