गुगल मॅपवर 'Anti National' सर्च केल्यावर रिझल्ट मिळतो जेएनयू
By Admin | Updated: March 25, 2016 13:42 IST2016-03-25T13:30:22+5:302016-03-25T13:42:20+5:30
गुगल मॅपवर 'Anti National' टाईप करुन सर्च केलं असता दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दाखवलं जात आहे

गुगल मॅपवर 'Anti National' सर्च केल्यावर रिझल्ट मिळतो जेएनयू
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २५ - जगातील कोणत्याही ठिकाणी पोहोचायचं असेल तर गुगुल मॅपवर सर्च करणे हा झटपट पर्याय सगळेचण निवडतात. मात्र गुगल मॅपवर 'Anti National' टाईप करुन सर्च केलं असता दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ दाखवलं जात आहे. गुगलकडून हे चुकून झालं आहे की हॅकरने जाणुनबुजून हे केलं आहे का ? स्पष्ट झालेलं नाही. मात्र यावरुन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जवाहरलाल नेहरु विद्यापीठात 9 फेब्रुवारीला दहशतवादी अफजल गुरुच्या समर्थनार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. ज्यामध्ये देशविरोधी घोषणा देण्यात आल्या होत्या. देशद्रोहाच्या आरोपाखाली जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमारला अटकदेखील झाली होती.