जेएनयू वादात शत्रुघ्न सिन्हांची उडी

By Admin | Updated: February 17, 2016 12:25 IST2016-02-17T11:38:23+5:302016-02-17T12:25:08+5:30

त्रुघ्न सिन्हा यांनी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार निर्दोष असल्याचा दावा केला आहे

JNU dispute Shatrughan Sinha jump | जेएनयू वादात शत्रुघ्न सिन्हांची उडी

जेएनयू वादात शत्रुघ्न सिन्हांची उडी

 
ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. 17 - जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) वादात आता भाजप खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेतली आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी  जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार निर्दोष असल्याचा दावा केला आहे. 
शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरुन आपले मत मांडले आहे, ज्यामध्ये त्यांनी कन्हैय्या कुमारने कोणतंही देशविरोधी वक्तव्य केलं नसल्याचं म्हणत आपल्या पक्षाच्या विरोधातच भुमिका घेतली आहे. 
 'जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आमचा बिहारी मुलगा कन्हैय्या कुमारच भाषण मी ऐकल आहे. त्याने कोणतही देशविरोधी किंवा राज्यघटनेविरोधी वक्तव्य केलेलं नाही' असं ट्विट शत्रुघ्न सिन्हा यांनी केले आहे. 
 
 
 
 

Web Title: JNU dispute Shatrughan Sinha jump