JNU attack : जेएनयूनंतर अहमदाबादमध्ये राडा; एबीव्हीपी आणि एनएसयूआयचे विद्यार्थी भिडले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 02:37 PM2020-01-07T14:37:01+5:302020-01-07T15:02:45+5:30

जेएनयूनंतर आता अहमदाबादमध्येही दोन विद्यार्थी संघटनामध्ये राडा झाला आहे.

jnu attack : Clash between ABVP and NSUI workers in Ahmedabad | JNU attack : जेएनयूनंतर अहमदाबादमध्ये राडा; एबीव्हीपी आणि एनएसयूआयचे विद्यार्थी भिडले 

JNU attack : जेएनयूनंतर अहमदाबादमध्ये राडा; एबीव्हीपी आणि एनएसयूआयचे विद्यार्थी भिडले 

googlenewsNext

अहमदाबाद -  दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांना झालेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. दरम्यान, जेएनयूनंतर आता अहमदाबादमध्येही दोन विद्यार्थी संघटनामध्ये राडा झाला आहे. येथील एबीव्हीपीच्या कार्यालयासमोर एबीव्हीपी आणि एनएसयूआय या संघटनांचे विद्यार्थी भिडले. यावेळी दोन्ही गटांकडून एकमेकांना दगड आणि लाठ्याकाठ्या घेऊन मारहाण करण्यात आली. या हाणामारीमुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले. दरम्यान, येथून जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. 

अहमदाबाद येथे एबीव्हीपीच्या कार्यालयाबाहेर जेएनयूमधील हिंसाचाराविरोधात आंदोलन होत होते. त्याचवेळी एनएसयूआय आणि एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्हीकडून एकमेकांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या हामाणारीत सुमारे 10 जण जखमी झाले. 

तत्पूर्वी काल रात्री कोलकातामध्ये जेएनयू हल्ल्याविरोधात जाधवपूर विद्यापीठामध्ये डाव्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. यावेळी भाजपाची रॅलीही निघत होती. या दोघांची रॅली समोरासमोर आल्याने बाचाबाची झाली. यावेळी दगडफेकही करण्यात आली होती. तसेच पोलिसांचे बॅरिकेडही तोडण्यात आले. या दरम्यान तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. 

संपूर्ण देश आज काश्मीर बनलाय; भाजपाच्या माजी मंत्र्यांचा मोदी-शहांवर हल्लाबोल

संजय राऊतांनी सांगितला 'फ्री काश्मीर'चा अर्थ; भाजपाला चोख प्रत्युत्तर

JNU Attack: अभिनेते अनुपम खेर म्हणाले, "त्या गुंडांना लवकरात लवकर पकडा..."

रविवारी संध्याकाळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात 6.30 वाजताच्या सुमारास जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारीनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  या हाणामारीत जवळपास 20 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका शिक्षिकेचाही समावेश होता. विशेष म्हणजे या धुमश्चक्रीत विद्यार्थी आणि शिक्षकांनाही जबर मारहाण करण्यात आली होती. या प्रकारानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. 

 

Web Title: jnu attack : Clash between ABVP and NSUI workers in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.