शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचे लोक भगवी वस्त्रं घालून महिलांची अब्रू लुटतात; हेमंत सोरेन यांची वादग्रस्त टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 17:15 IST

योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर वादग्रस्त टीका

पाकूर: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त टीका केली आहे. आज देशात महिलांना जिवंत जाळलं जात आहे. इथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी भगवी वस्त्रं घालून फिरत असल्याचं मला समजलं. हे भाजपाचे नेते लग्न कमी करतात.  मात्र भगवी वस्त्रं घालून महिलांची अब्रू लुटण्याची कामं करतात, असं वादग्रस्त विधान सोरेन यांनी केलं. पाकूरमध्ये झालेल्या जनसभेत त्यांनी हे वक्तव्य केलं. झारखंड विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी पाकूर येथील सभेत योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपाच्या नेत्यांवर अतिशय वादग्रस्त टीका केली. भाजपाचे नेते महिलांची अब्रू लुटण्याची कामं करतात, असं विधान त्यांनी केलं. महिलांच्या सुरक्षेवर भाष्य करताना सोरेन यांची जीभ घसरली आणि भाजपा नेते भगवी वस्त्रे घालून महिलांची अब्रू लुटतात, असं वक्तव्य त्यांनी केलं. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगानं केली होती. यापैकी चार टप्प्यांमधलं मतदान पूर्ण झालं आहे. पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातलं मतदान २० डिसेंबरला होईल. त्यावेळी १६ मतदारसंघांमधले मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यासह मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी लुईस मरांडी आणि रणधीर सिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाRapeबलात्कार