जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद
By Admin | Updated: May 6, 2017 22:46 IST2017-05-06T22:46:36+5:302017-05-06T22:46:36+5:30
कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत

जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला, दोन पोलीस शहीद
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6 - कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले आहेत. या हल्ल्यात दोन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मीर बाजार परिसरात काही पोलीस कर्मचारी श्रीनगर - जम्मू हायवेवरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी एका अज्ञात बंदुकधा-याने पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.
या हल्ल्यात दोन पोलीस आणि दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सर्व परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. सर्च ऑपरेशनही सुरु करण्यात आलं आहे.