शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

काश्मीरमधल्या शोपियानमध्ये स्कूल बसवर दगडफेक, एक लहानगा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 17:05 IST

शोपियानमधल्या कनिपोरामध्ये चक्क एका स्कूल बसवर दगडफेक करण्यात आल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन टेररिस्ट ऑलआऊटअंतर्गत हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी समीर टायगर याचा खात्मा केला होता. त्यानंतर काश्मीर खो-यात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेनंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दगडफेक करण्यात आली आहे.शोपियानमधल्या कनिपोरामध्ये चक्क एका स्कूल बसवर दगडफेक करण्यात आल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या दगडफेकीत स्कूल बसमधील एक मुलगा जखमी झालाय. स्कूल बसमध्ये 4 ते 5 वर्षांची मुलं होतं. दगडफेकीच्या घटनेचा सर्वच स्तरांतून जोरदार निषेध नोंदवला जातोय. मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तींपासून माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या प्रकाराची निंदा केली आहे.यावेळी शोपियानमध्ये पीडीपी आमदार मोहम्मद युसूफ यांच्या घरावरही अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकले आहेत. दगडफेकीत जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितलं की, माझा मुलगा दगडफेकीत जखमी झाला. हे माणुसकीच्या विरोधात आहे. उद्या कोणत्याही निरागस मुलाबरोबर असं होऊ शकतो.जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या प्रकाराचा निषेध नोंदवत स्कूल बसमधल्या मुलांवर दगडफेक करणा-यांना खडे बोल सुनावले आहेत. लहान मुलं आणि पर्यटकांवर दगड फेकून हे दगडफेक करणारे स्वतःचा अजेंडा कशा प्रकारे पूर्ण करतायत. आपण सर्वांनी मिळून यांना धडा शिकवायला हवा. जम्मू-काश्मीरचे महासंचालक एसपी वैद्य यांनीही तर हा वेडेपणा असल्याचं सांगितलं आहे. उपद्रवी लोकांनी रेनबो स्कूल बसवर शोपियानमध्ये दगडफेक केली आहे. ज्यात दुस-या इयत्तेत शिकणारा मुलगा रेहान जखमी झाला आहे. या आरोपींना कायद्याचा सामना करावा लागणार आहे. रेहानला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दगडफेक करणारे आता लहान मुलांना निशाणा बनवत आहेत, हा वेडेपणा आहे, असंही एसपी वैद्य म्हणाले आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर