शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

BJP खासदाराला धक्का मारल्याचा राहुल गांधींवर आरोप; ओमर अब्दुल्ला म्हणाले, "त्यांच्या स्वभावात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:37 IST

संसदेतल्या राड्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Parliament Winter Session:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्याबाबत आज काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह सर्व नेते निळ्या कपड्यात संसदेत आले होते. काँग्रेसला आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरुन भाजपला कोंडीत पकडण्याची संधी होती. मात्र दुपारपर्यंत सारे प्रकरण त्यांच्याच अंगलट आले. भाजपचे नेतेही काँग्रेसविरोधात आंदोलन करत होते. मात्र दोन्ही बाजूचे खासदार जेव्हा संसदेच्या मकर गेटवर पोहोचले तेव्हा बाचाबाची सुरू झाली. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ खासदार प्रताप सारंगी पडून जखमी झाले. त्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आरोप लावल्यानंतर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे.

बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या विधानावरुन संसदेबाहेर आंदोलनादरम्यान धक्काबुक्की झाली. भाजप खासदार प्रतापचंद्र सारंगी आणि मुकेश राजपूत या घटनेत जखमी झालेले प्रताप सारंगी यांनी राहुल गांधींवर आरोप केला. त्याचवेळी दुसरे खासदार मुकेश राजपूत यांनीही राहुल यांना यासाठी जबाबदार धरले. प्रताप सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे मकरद्वार येथे भाजप खासदारांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्याशी बाचाबाची केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

"राहुल गांधींनी माझ्यावर पडलेल्या खासदाराला धक्का दिला आणि त्यानंतर मी खाली पडलो. मी पायऱ्यांजवळ उभा होतो तेव्हा राहुल गांधी आले आणि माझ्यावर पडलेल्या खासदाराला धक्का दिला," असा आरोप प्रताप सारंगी यांनी केला. दुसरीकडे, मात्र राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी असं काही करु शकत नाही, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.

ओमर अब्दुल्ला यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबत भाष्य केलं आहे. "मी राहुल गांधींना ओळखतो. ते संसद सदस्य सोडा कोणाला धक्का देणार नाहीत. कोणाशीही असभ्य किंवा वाईट वागणे त्यांच्या स्वभावात नाही," असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आरोप केला की, "राहुल गांधी धक्काबुक्कीसाठी आले होते. त्यांचे वर्तन गुंडासारखे होते. हा देश गुंडांना खपवून घेणार नाही. आमच्या एका वयोवृद्ध खासदाराला त्यांनी धक्काबुक्की करून खाली पाडले."

टॅग्स :ParliamentसंसदRahul Gandhiराहुल गांधीOmar Abdullahउमर अब्दुल्ला