१६ फेब्रुवारीपासून जीटॉक ऑफलाइन
By Admin | Updated: February 5, 2015 17:31 IST2015-02-05T17:31:53+5:302015-02-05T17:31:53+5:30
चॅटिंगसाठी लोकप्रिय ठरलेले गुगलचे जीटॉक हे १६ फेब्रुवारीपासून कायमचे ऑफलाइन जाणार आहे.

१६ फेब्रुवारीपासून जीटॉक ऑफलाइन
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ५ - चॅटिंगसाठी लोकप्रिय ठरलेले गुगलचे जीटॉक मॅसेंजर हे १६ फेब्रुवारीपासून कायमचे ऑफलाइन जाणार आहे. गुगललने जीटॉक बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी आता गुगल हॅँगहाऊट ही अत्याधूनिक मॅसेंजर वापरावी लागणार आहे.
गुगलने सर्व युजर्ससाठी जीटॉकऐवजी गुगल हँगआऊट हा नवा पर्याय यापूर्वीच सुरु केला होता. ग्रुप चॅटिंग, व्हिडीओ कॉल, फोटो शेअर अशा अनेक नवीन सुविधा गुगल हँगआऊटमध्ये देण्यात आल्या होत्या. मात्र तरीदेखील अनेक युजर्स हँगआऊटऐवजी जीटॉक वापरणे पसंत करत होते. काही महिन्यांपूर्वी गुगलने जीटॉकला सपोर्ट (सुरक्षा व अपडेट) देणे बंद करत जीटॉक बंद करण्याचे संकेत दिले होते. आता गुगलने १६ फेब्रुवारीपासून जीटॉकला कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. १६ फेब्रुवारीपासून जीटॉक इतिहासजमा होईल. जीटॉक वापरणा-यांना हँगआऊटचला अपडेट व्हावे लागणार आहे.