जेआयपीएलच्या संचालकाला चार वर्षांचा तुरुंगवास
By Admin | Updated: April 4, 2016 16:49 IST2016-04-04T16:49:36+5:302016-04-04T16:49:36+5:30
जेआयपीएलचे संचालक आर. सी. रुंगटा यांना विशेष कोर्टानं सोमवारी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली

जेआयपीएलच्या संचालकाला चार वर्षांचा तुरुंगवास
नवी दिल्ली, दि. 04- कोळसा घोटाळा प्रकरणात झारखंडच्या इस्पात प्रायव्हेट लिमिटेड म्हणजेच जेआयपीएलचे संचालक आर. सी. रुंगटा यांना विशेष कोर्टानं सोमवारी चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
कोळसा घोटाळ्यावर पहिल्यांदा सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी निर्णय दिला होता. घोटाळ्यातील आरोपीला प्रत्येकी पाच लाखांचा दंड भरण्याचा निर्णय दिला होता. विशेष कोर्टानं रुंगटा यांना दंडाच्या स्वरूपात 25 लाख रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास 132 पानांचं आरोपपत्र यावेळी कोर्टात सादर करण्यात आलं आहे.
जवळपास 19 प्रकरणांची चौकशी सीबीआयकडून प्रलंबित असल्याचं यावेळी कोर्टात माहिती सादर करण्यात आली. आणि दोन प्रकरणांचा ईडी तपास करत असल्याचंही कोर्टात सांगण्यात आलं. जेआयपीएलचे संचालक आर. सी. रुंगटांविरोधात भारतीय दंड संहिता 467, 468, 471 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.