शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धन धना धन! जिओनं कमाईत पटकावलं दुसरं स्थान; व्होडाफोनची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 11:21 IST

Jio Overtake Vodafone: महसुली उत्पन्नात एअरटेल पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली: रिलायन्स जिओ इन्फोकॉमनं कमाईच्या बाबतीत दूरसंचार क्षेत्रात देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. रिलायन्स जिओनंव्होडाफोनला मागे टाकलं आहे. याशिवाय जिओनं भारती एअरटेलला मागे टाकण्याच्या दृष्टीनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ग्रामीण भागात मारलेली मुसंडी आणि कमी किमतीत दिल्या जाणाऱ्या सेवांच्या जोरावर जिओनं दमदार कामगिरी केली आहे. यामुळे जिओच्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओनं दोन वर्षांपूर्वी 4जी सेवा देण्यास सुरुवात केली. दोनच वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं महसुली उत्पन्नाच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. देशातील दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्यांचा महसूल लक्षात घेता, त्यातील रिलायन्स जिओचा वाटा 22.4 टक्के इतका आहे. जून 2018 च्या तिमाहीत रिलायन्स जिओनं मोठी मुसंडी मारली आहे. मार्च तिमाहीच्या तुलनेत जिओच्या महसूलात 2.53 टक्क्यांची वाढ झाली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरटी ऑफ इंडियानं (ट्राय) ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. जून तिमाहीत व्होडाफोनच्या महसुली उत्पन्नात 1.75 टक्क्यांची घट झाली. त्यामुळे व्होडाफोनचा महसुली उत्पन्नातील वाटा 19.3 टक्क्क्यांवर आला. तर कुमार मंगलम बिर्ला यांच्या आयडियाचा वाटा 15.4 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकावर असलेल्या एअरटेलचा महसुली उत्पन्नातील वाटा घसरला आहे. देशातील दूरसंचार कंपन्यांचं एकूण महसूल लक्षात घेतल्यास, त्यातील एअरटेलचा वाटा 31.7 टक्के इतका आहे. महसुलच्या बाबतीत एअरटेल पहिल्या क्रमांकावर आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओJioजिओVodafoneव्होडाफोन