जिहादी भारतावर करतील अण्वस्त्रांचा हल्ला - हिलरी क्लिंटन

By Admin | Updated: September 30, 2016 19:20 IST2016-09-30T19:20:05+5:302016-09-30T19:20:05+5:30

पाकिस्तानची अण्वस्त्रे जिहादींच्या हातात पडतील अशी भीती अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे

Jihadi to India will attack nuclear weapons - Hillary Clinton | जिहादी भारतावर करतील अण्वस्त्रांचा हल्ला - हिलरी क्लिंटन

जिहादी भारतावर करतील अण्वस्त्रांचा हल्ला - हिलरी क्लिंटन

>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 30 - पाकिस्तानची अण्वस्त्रे जिहादींच्या हातात पडतील अशी भीती अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केली आहे. जर तसं झालं तर ती अत्यंत भीतीदायक बाब असेल असं क्लिंटन म्हणाल्या आहेत. भारताबरोबर शत्रुत्व बाळगणारा पाकिस्तान अण्वस्त्रसज्जतेच्या बाबतीत वेगाने घोडदौड करत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. आम्हाला अशी भीती वाटते आहे की, पाकिस्तानमध्ये उठाव होईल आणि जिहादी सरकार ताब्यात घेतील, तसं झालं तर आत्मघातकी जिहादी असतील ज्यांच्याकडे अण्वस्त्र असतील असा इशारा क्लिंटन यांनी दिला आहे.
असं झालं तर ही सगळ्यात जास्त धोकादायक बाब असंही त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानी खासदारानं भारताविरुद्ध अण्वस्त्र वापरण्याची धमकी देण्याच्या पार्श्वभूमीवर क्लिंटन यांनी व्यक्त केलेली भीती अर्थपूर्ण आहे.

Web Title: Jihadi to India will attack nuclear weapons - Hillary Clinton