भारताविरुद्ध जिहाद करणार - हाफिज सईद बरळला
By Admin | Updated: December 6, 2014 12:41 IST2014-12-06T12:41:25+5:302014-12-06T12:41:25+5:30
काश्मिरचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाहीत, तर भारताविरोधात जिहाद करण्याची धमकी, मुंबई बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि जमात उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने दिली आहे

भारताविरुद्ध जिहाद करणार - हाफिज सईद बरळला
ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. ६ - काश्मिरचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाहीत, तर भारताविरोधात जिहाद करण्याची धमकी, मुंबई बाँबस्फोटांचा मुख्य सूत्रधार आणि जमात उल दावाचा म्होरक्या हाफिज सईद याने दिली आहे. संयुक्त राष्ट्रांसह जगातल्या प्रमुख देशांनी दहशतवादी घोषित ठरवलेल्या सईदने लाहोरमध्ये खुलेआम सभा घतेली आणि त्याला पाकिस्तानी सरकारने मदत केली. पाकिस्तानातल्या हजारो जिहादी विचारसरणीच्या पाकिस्तानी नागरिकांनी हजेरी लावली होती.
सईद याने पाकिस्तानचे पंतप्रधान यांनाही अल्लाहच्या नावाने आदेश दिला आहे की, भारताशी काश्मिर प्रश्नावर ताबडतोब बोलणी करावीत आणि काश्मिरी मुसलमानांचा प्रश्न सोडवावा. जर शरीफ यांनी प्रश्नात लक्ष घातले नाही आणि भारताने हा प्रश्न सोडवला नाही तर तर काश्मिर हा दरवाजा असेल आणि भारत हे लक्ष्य असेल आणि भारताविरोधात जिहाद पुकारण्यात येईल असे आव्हान दिले आहे. दरम्यान, काश्मिरमधल्या निवडणुका सुरळित होई नयेत म्हणून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ल्यांचे सत्र आरंभले असून दहशतवाद्यांच्या सामानामध्ये पाकिस्तानातील वस्तुंचा तसेच शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानी बनावटीच्या खुणा आढळून आल्या आहेत. पाकिस्तानातील आयएसआय सारख्या सरकारी संस्था दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या आरोपाला याुळे पुष्टी मिलाली आहे.
दरम्यान, काश्मिरमधल्या दहशतवादी हल्ल्यांची अमेरिकेनेही निंदा केली आहे.