झारखंडमध्ये झाविमोचे सहा आमदार भाजपत
By Admin | Updated: February 11, 2015 23:43 IST2015-02-11T23:43:26+5:302015-02-11T23:43:26+5:30
झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक) सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी

झारखंडमध्ये झाविमोचे सहा आमदार भाजपत
नवी दिल्ली : झारखंड विकास मोर्चाच्या (प्रजातांत्रिक) सहा आमदारांनी बुधवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्य विधानसभेत आम्हाला सत्ताधारी आघाडीच्या सदस्यांसोबत बसण्याची परवानगी दिली जावी, अशी विनंती त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्षांना केली होती.
नवीन जयस्वाल (हतिया), अमरकुमार बौरी (चंदनकियारी), गणेश गंजू (सिमेरिया), आलोककुमार चौरसिया (डाल्टनगंज), रणजीतसिंग (सारथ) आणि जानकी यादव (बरखटा)यांनी नवी दिल्लीतील झारखंड भवनात राज्याचे मुख्यमंत्री रघुवर दास आणि भाजपच्या इतर नेत्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतल्याची माहिती प्रदेश भाजपचे प्रवक्ते प्रदीप सिन्हा यांनी दिली.
सध्या ८१ सदस्यीय झारखंड विधानसभेत भाजपची सदस्य संख्या ३७ असून सुदेश महतो यांच्या आजसूच्या मदतीने त्यांनी राज्यात सरकार स्थापन केले आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)