शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Jharkhand Political crisis: झारखंडची वाटचाल राजकीय अस्थिरतेकडे, राज्यपाल रमेश बैस राजधानीत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 08:25 IST

Jharkhand Political crisis: झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी दिल्लीत  दाखल झाल्याने मुख्यमंत्री हेमंत  सोरेन यांच्या भविष्याबाबत उलटी गिणती सुरू झाली आहे.

- शरद गुप्ता नवी दिल्ली : झारखंडचे राज्यपाल रमेश बैस हे शुक्रवारी दिल्लीत  दाखल झाल्याने मुख्यमंत्री हेमंत  सोरेन यांच्या भविष्याबाबत उलटी गिणती सुरू झाली आहे. हेमंत  सोरेन यांच्या विरुद्धच्या लाभाच्या पदाच्या आरोपाबाबत निवडणूक आयोगाने आपला अहवाल राज्यपालांना सोपविल्याला आठ दिवस उलटून गेले आहेत. त्यानंतरही राज्यपालांनी आपला निर्णय दिलेला नाही. गुरुवारी त्यांनी सांगितले  होते की, ते अद्यापही कायदेशीर मत घेत आहेत.सूत्रांनी सांगितले की, सोरेन यांना काँग्रेस आमदारांच्या निष्ठेवर  विश्वास नाही. पक्षाच्या १८ पैकी ३ आमदारांना पश्चिम बंगालमध्ये मोठ्या रकमेसह पकडले होते. तेथील न्यायालयाने सुनावणी होईपर्यंत प. बंगाल सोडू नये, असे सांगितले आहे. राज्य काँग्रेसने त्यांचे पक्षाचे सदस्यत्वही निलंबित केले आहे. त्यामुळे ते सोरेन यांच्या बाजूने मत देऊ शकणार नाहीत. झामुमोच्या सूत्रांनी सांगितले की, अन्य १५ आमदारांच्या निष्ठेबाबतही संशय आहे. आपल्या पक्षाचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती हेमंत सोरेन यांना मिळाली आहे. 

राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यतास्थिती पाहता ५ सप्टेंबरला होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावापूर्वी जर राज्यपालांनी सोरेन यांना अपात्र घोषित केले, तर यूपीएच्या विधिमंडळ पक्षात पळापळ होईल. भाजपकडे बहुमत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. बाबुलाल मरांडी ठरू शकतात अपात्र हेमंत सोरेन हेही झारखंड विकास पार्टीचे माजी अध्यक्ष बाबुलाल मरांडी यांना अपात्र घोषित करू शकतात. २४ फेब्रुवारीला ते भाजपमध्ये दाखल होऊन विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले गेले. त्यांच्या तीन आमदारांनी त्यांच्याविरुद्ध विधानसभांकडे पक्षबदलविरोधी कायद्यानुसार अपात्र घोषित करण्यासाठी पत्र दिले आहे. याची सुनावणी झाली आहे. 

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण