शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Jharkhand: ऑपरेशन लोटसमुळे आमदारांची पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 06:48 IST

Operation Lotus in Jharkhand: मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अपात्रतेबाबतचा आदेश कधी जारी केला जातो, याची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, ऑपरेशन लोटसच्या भीतीने मुख्यमंत्री तासा-तासाला रणनीती बदलत आहेत.

- एस. पी. सिन्हारांची : झारखंडमध्ये वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेची प्रतीक्षा केली जात आहे. राज्यपाल रमेश बैंस यांनी निवडणूक आयोगाशी संवैधानिक मुद्द्यांबाबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अपात्रतेबाबतचा आदेश कधी जारी केला जातो, याची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, ऑपरेशन लोटसच्या भीतीने मुख्यमंत्री तासा-तासाला रणनीती बदलत आहेत.आमदारांची एकजूट राखण्यासाठी व सरकार वाचविण्यासाठी हेमंत सोरेन आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत. मागील तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा झारखंडचे काँग्रेस प्रभारी अविनाश पांडे रांचीमध्ये दाखल झाले व त्यांनी रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या आमदारांची बैठक घेतली. सर्व आमदारांना रांचीमध्येच वास्तव्यास राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुख्यमंत्री सोरेन हे पांडे यांची भेट घेण्यासाठी रांचीच्या मोरहबादीस्थित स्टेट गेस्ट हाऊसमध्ये गेले होते.शनिवारीच हेमंत सोरेन हे महागठबंधनच्या आमदारांची बैठक घेतल्यानंतर आमदारांना बसमध्ये घेऊन बाहेर पडले होते. ऑपरेशन लोटसच्या भीतीने ते आमदारांना घेऊन छत्तीसगढमध्ये जात असल्याचे सांगितले जात होते. परंतु ते खुंटीच्या एका रिसॉर्टमध्ये गेले व पर्यटनाचा आनंद घेऊन रात्री रांचीमध्ये परतले.

टॅग्स :JharkhandझारखंडPoliticsराजकारण