शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: जय श्रीराम म्हणण्याची सक्ती करत जमावाची मारहाण; तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 08:53 IST

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

रांची: चोरीच्या संशयावरुन जमावानं केलेल्या जबर मारहाणीत एका मुस्लिम तरुणाचा मृत्यू झाला. झारखंडमधील खारसावन जिल्ह्यात हा प्रकार घडला. या तरुणाला कित्येक तास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र गंभीर दुखापत झाल्यानं त्याचा मृत्यू झाला. या तरुणाला झालेल्या मारहाणीचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्यात त्याला जय श्रीराम म्हणण्यास सांगितलं जात आहे. 'इंडिया टुडे'नं हे वृत्त दिलं आहे. जमावानं केलेल्या मारहाणीत 24 वर्षीय तबरेज अन्सारी गंभीर जखमी झाला. 22 जूनला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तबरेजला लाकडी काठीनं मारहाण केली जात असल्याचं दिसत आहे. याशिवाय त्याला 'जय श्रीराम' आणि 'जय हनुमान' म्हणण्यासदेखील सांगितलं जात आहे. 18 जूनला हा संपूर्ण प्रकार घडला. त्यानंतर तबरेजला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं 22 जूनला त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. तबरेजच्या मृत्यूनंतर पप्पू मंडलला अटक करण्यात आली. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.तबरेज पुण्यात वेल्डर म्हणून काम करत होता. कुटुंबासोबत ईद साजरी करण्यासाठी तो झारखंडला गेला होता. येत्या काही दिवसात त्याचा निकाह होणार होता. 18 जूनला तो दोन व्यक्तींसोबत जमशेदपूरहून निघाला. या दोन व्यक्ती कुठे घेऊन चालल्या आहेत, याची माहिती तबरेजला नव्हती, असं सामाजिक कार्यकर्ते औरंगजेब अन्सारी यांनी 'हफपोस्ट इंडिया'ला सांगितलं. तबरेजची दिशाभूल करुन दोन व्यक्ती त्याला घेऊन गेल्या, असा दावादेखील त्यांनी केला. त्या दोन व्यक्ती अचानक पळून गेल्या आणि जमावानं तबरेजला चोरीच्या आरोपावरुन जबर मारहाण केली, अशी माहिती अन्सारींनी दिली. 

टॅग्स :LynchingलीचिंगJharkhandझारखंडMuslimमुस्लीम