झारखंड, जम्मू-काश्मीरात निर्भय मतदानाचा उत्साह

By Admin | Updated: December 10, 2014 02:32 IST2014-12-10T02:32:32+5:302014-12-10T02:32:32+5:30

दहशतवाद आणि नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता मतदारांनी आज मंगळवारी तिस:या टप्प्याच्या मतदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़

Jharkhand, J & K enthusiasm for fearless voting | झारखंड, जम्मू-काश्मीरात निर्भय मतदानाचा उत्साह

झारखंड, जम्मू-काश्मीरात निर्भय मतदानाचा उत्साह

श्रीनगर/ रांची : जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांत दहशतवाद आणि नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता मतदारांनी आज मंगळवारी तिस:या टप्प्याच्या मतदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला़ तिस:या टप्प्यात जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 16 जागांसाठी 58 टक्के तर झारखंड विधानसभेच्या 17 जागांसाठी 61 टक्के मतदान झाल़े
जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमधील ताजे अतिरेकी हल्ले आणि फुटिरवाद्यांचे मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन याचा मतदारांवर कुठलाही परिणाम झाला नाही़ निर्भय होत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़ पहिल्या दोन टप्प्यांच्या तुलनेत आजच्या तिस:या टप्प्यात कमी मतदान झाले असले तरी 2क्क्8 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी तब्बल 9 टक्के अधिक मतदान झाल़े मतदारांनी पत्रकारांशी बोलतानाही निर्भयतेचीच साक्ष दिली. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याने आम्ही का बरे घाबरावे? मतदान हे आमचे कर्तव्य आहे व ते आम्ही बजावणारच. यावेळी तर आम्ही अधिक निर्धाराने मतदानासाठी आलो आहोत, असे गुलाम मोहम्मद नजर, सुलतान मोहम्मद ठाकूर  व  अली नझीर याकूब या मतदारांनी ठामपणो सांगितले. दुपार्पयत उरीमध्ये सुमारे 4क् टक्के मतदान झाले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते व जम्मू-काश्मीरचे आरोग्यमंत्री ताज मोहिउद्दीन येथून निवडणूक लढवीत आहेत. झारखंडमध्ये तिस:या टप्प्यात 61 टक्के मतदान झाल़े (वृत्तसंस्था)
 
च्जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमधील ताजे अतिरेकी हल्ले आणि फुटिरवाद्यांचे मतदानावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन याचा मतदारांवर कुठलाही परिणाम झाला नाही़ निर्भय होत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़  

 

Web Title: Jharkhand, J & K enthusiasm for fearless voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.